(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathi Bhasha Divas : उद्या मराठी भाषा दिवसानिमित्त मुंबई इंडियन्सचा खास उपक्रम, सर्व पोस्ट असणार मराठीतून, पाहा VIDEO
MI on Social Media : संपूर्ण महाराष्ट्रात 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मुंबई इंडियन्स क्लबने देखील या दिवशी एक खास उपक्रम राबवण्याचा विचार केला आहे.
IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील सर्वात यशस्वी संघ म्हणजे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians). मैदानावरील आपल्या दमदार खेळासाठी प्रसिद्ध या संघाचं सोशल मीडियाही तितकच दमदार आहे. मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स असलेल्या मुंबई इंडियन्स संघाच्या सोशल मीडिया पोस्ट कायमच हटके असतात. आता देखील मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक खास उपक्रम मराठी भाषा दिनानिमित्त राबला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मुंबई इंडियन्स क्लबने देखील या दिवशी आपल्या सर्व सोशल मीडिया पोस्ट या मराठीतून असणार असल्याचं जाहीर केलं आहे. एक खास व्हिडीओ पोस्ट करत ही घोषणा केली गेली आहे.
तर ही घोषणा करतानाचा व्हिडीओ पाहिला तर मुंबईतील एका दुकानात एक मुलगी मुंबईची जर्सी घालून काहीतरी खरेदी करताना दिसते. तिची खरेदी झाल्यानंतर दुकानदार सांगतो की आता आलेली ही मुलगी मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया पेजची अॅडमिन असून मराठी भाषा दिनानिमित्त 27 फेब्रुवारी रोजी सर्व MI च्या पोस्ट या मराठीतून असतील हे सांगून गेली आहे. तर नेमका हा व्हिडीओ कसा आहे पाहूया...
पाहा व्हिडिओ-
View this post on Instagram
महिला आयपीएलसाठी मुंबई इंडियन्स सज्ज
महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम 4 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिल्या सत्राचा सलामीचा सामना गुजरात आणि मुंबई यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. त्याच वेळी, या लीगचा अंतिम सामना 26 मार्च रोजी बेब्रॉन स्टेडियमवर खेळवला जाईल. दरम्यान पुरुषांच्या आयपीएलमधील चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सने महिला आयपीएलमध्येही भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिला कर्णधार म्हणून खरेदी केलं आहे. दरम्यान आता मुंबई इंडियन्सने आपली निळ्या रंगाची खास जर्सीही सर्वांसमोर आणली आहे. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रापूर्वी मुंबई इंडियन्सने आपली जर्सी देखील जाहीर केली आहे. मुंबईने एक खास फोटो शेअर करून या जर्सीचे अनावरण केलं आहे. मुंबईची ही जर्सी पुरुष संघाच्या जर्सीसारखीच दिसते. मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची जर्सी फिकट निळ्या रंगाची आहे. त्याच वेळी, जर्सीच्या दोन्ही बाजूंना गुलाबी रंग देखील दिसतो. ही जर्सी मुंबईच्या चाहत्यांना खूप आवडल्याचं त्यांच्या सोशल मीडिया कमेंट्सवरुन दिसत आहे.
🌅- here’s to sun, the sea, the blue-and-gold of Mumbai. Here’s to our first-ever #WPL jersey and all she brings. 🫶#OneFamily #MumbaiIndians #AaliRe pic.twitter.com/mOmNg0d9hO
— Mumbai Indians (@mipaltan) February 25, 2023
WPL 2023 साठी मुंबई इंडियन्सचा संघ
धारा गुजर, जिंतीमनी कलिता, प्रियांका बाला, हीदर ग्रॅहम, अमनजोत कौर, हरमनप्रीत कौर, हुमैरा काझी, अमेलिया केर, हेली मॅथ्यूज, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, नाटे स्क्राइव्हर, सायका इश्के, इसी वोंग, क्लोए ट्रायन, क्लोए ट्रायव्हन, इश्के.