Watch : आयपीएलमध्ये सुमार कामगिरीनंतर पुनरागमनासाठी हिटमॅन सज्ज, जीममध्ये गाळतोय घाम, मुंबई इंडियन्सने शेअर केला VIDEO
Rohit Sharma VIDEO: रोहित शर्मा आयपीएल 2022 नंतर सध्या ब्रेकवर आहे, पण या वेळेचाही तो योग्य वापर करुन घेत आहे.
![Watch : आयपीएलमध्ये सुमार कामगिरीनंतर पुनरागमनासाठी हिटमॅन सज्ज, जीममध्ये गाळतोय घाम, मुंबई इंडियन्सने शेअर केला VIDEO Mumbai Indians shares video of rohit sharma doing gym on there instagram Watch : आयपीएलमध्ये सुमार कामगिरीनंतर पुनरागमनासाठी हिटमॅन सज्ज, जीममध्ये गाळतोय घाम, मुंबई इंडियन्सने शेअर केला VIDEO](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/06/06d4c6def4cb028ee1e47008a5ff71ec_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rohit Sharma : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 9 जूनपासून टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. या सामन्यांसाठी अनेक युवा खेळाडूमना संधी दिली असून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. दरम्यान संघाचं कर्णधारपदही केएल राहुलला दिलं गेल्याने कर्णधार रोहित शर्माही ब्रेकवर असणार आहे. त्यामुळे आयपीएलनंतर सध्यातरी रोहित मैदानावर उतरताना दिसणार नसला तरी तो या वेळेचाही सदुपयोग करताना दिसत आहे.
रोहित शर्मा जीममध्ये कसून सराव करत असून या संबधित एक व्हिडीओ मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा जीममध्ये अगदी जोर लावून सराव करत आहे. सध्या सामने खेळायचे नसले तरी फिटनेस जपण्यासाठी रोहित व्यायाम करताना दिसत आहे. आज म्हणजेच सोमवारी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्याने यावेळी तुमच्या आठवड्याची सुरुवात मंडे मोटिवेशनने करा असं कॅप्शन यावेळी देण्यात आलं आहे.
मुंबईसह रोहितचं सुमार प्रदर्शन
यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाने अतिशय खराब कामगिरी केली. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबईचा यंदाच्या हंगामात 14 सामन्यांपैकी 10 सामन्यात पराभव झाला. यावेळी संघाचा महत्त्वाचा खेळाडू कर्णधार रोहित शर्माही अतिशय फ्लॉप ठरला. त्याने 14 सामन्यात केवळ 268 रन केले. यावेळी तो साध एक अर्धशतकही ठोकू शकला नाही. या खराब हंगामाबाबत बोलताना रोहित म्हणाला होता की, 'आता भविष्यातील सामन्यात आणि पुढील हंगामात योग्य कामगिरी करण्यासाठी मुंबईचा संघ आतापासून पुढील उर्वरीत सामन्यात नवनवीन खेळाडूंना संधी देणार आहे.'
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)