मुंबईच्या टिम डेविडचा PSL मध्ये धमाका; सलग पाच षटकार, 20 चेंडूत झळकावलं अर्धशतक
Tim David : पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत टिम डेविड याने विस्फोटक फलंदाजी केली.
Mumbai Indians Tim David : पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत टिम डेविड याने विस्फोटक फलंदाजी केली. त्याने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे टिम डेविडने सलग पाच षटकार लगावले. पीएसएलमध्ये आज इस्लामाबाद यूनायटेड आणि मुल्तान सुल्तान यांच्यामध्ये आज सामना झाला. या सामन्यात प्रथम मुल्तान सुल्तांस संघाची प्रथम फलंदाजी होती. यावेळी टिम डेविड याने आक्रमक फलंदाजी केली. टीम डेविडने 27 चेंडूत 60 धावांचा पाऊस पाडला. यादरम्यान, त्याने चार चौकार आमि पाच षटकार लगावले. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 222.22 इतका होता. डेविड आयपीएलमध्ये मुंबई संघाचा भाग आहे. पुढील महिन्यात आयपीएल स्पर्धा सुरु होणार आहे, त्यापूर्वी टिम डेविड फॉर्मात परतलाय. ही मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे.
टिम डेविडच्या तुफानी फलंदाजीमुळे मुल्तान संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. मुल्तान संघाने निर्धारित 20 षटकात पाच विकेट्सच्या मोबदल्यात 205 धावांचा डोंगर उभारला. टिम डेविडच्या विस्फोटक खेळीशिवाय शान मसूद याने 50 चेंडूत 75 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 12 चौकार लगावले. त्याशिवाय कर्णधार मोहम्मद रिजवान याने 18 चेंडूत 33 धावांची छोटेखानी खेळी केली. त्याशिवाय रिली रोसो याने 15 आणि डेविड मिलर याने 11 धावांची खेळी केली. कायरन पोलार्ड एक धाव काढून नाबाद राहिला.
30 runs off the over, including four sixes in a row off the bat of Tim David 😮#PSL2023pic.twitter.com/6yK6vTPFgm
— Wisden (@WisdenCricket) March 7, 2023
Shot of #HBLPSL2023.
— Sports.world (@moiz_sports) March 7, 2023
Speed gun Haris Rauf bowled at 147kph and super talented player a Mr.360 shot and it goes all the way for six.#BabarAzam𓃵
Tim David#MSvsIU
Jersey#shaheenafridi
4th Test pic.twitter.com/uPKjEuo9Rf
Tim David shone on his first appearance in #HBLPSL8 #HBLPSL2023 pic.twitter.com/k0aH1YaQtU
— DiscussingCricket (@DiscussingCric) March 7, 2023
मुंबईसाठी खूशखबर -
टिम डेविड याचं हे प्रदर्शन मुंबईसाठी दिलासादायक आहे. आयपीएल 2023 ची सुरुवात 31 मार्चपासून होत आहे. आयपीएलपूर्वी मुंबईचे फलंदाज फार्मात परत येत आहेत. आयपीएल 2022 मध्ये टिम डेविड याने मुंबई इंडियन्ससाठी आठ सामने खेळले होते, यामध्ये त्याने 216 च्या स्ट्राइक रेटने 186 धावा केल्या होत्या. टिम डेविडच्या विस्फोटक खेळीनंतर मुंबईचे चाहते आनंदात आहेत.
टिम डेविड याचं आयपीएल करिअर -
टिम डेविड याने 2021 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यावर्षी त्यानं फक्त एक सामना खेळला होता. 2022 मध्ये त्याने आठ सामने खळले आहेत. आतापर्यंत टिम डेविड याने नऊ सामन्यात 187 धावा केल्या आहेत.