(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केवळ तीन मॅच खेळलो, धोनी म्हणाला 'तू वर्ल्डकपमध्ये झळकणार' : हार्दिक पांड्या
Hardik Pandya : भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.
Hardik Pandya on MS Dhoni : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) यांच्यातील सामन्यांसाठी संघात हार्दिक पांड्याला (Hardik pandya) संधी मिळाली आहे. हार्दिकने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत संघाला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर त्याला पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळालं आहे. दरम्यान त्याने 2016 सालच्या एका घटनेबाबत खुलासा करत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने कशाप्रकारे पांड्यातील टँलेंट ओळखलं होतं, याबाबतही खास खुलासा केला आहे.
हार्दिकने धोनीबाबत बोलताना, 'मी केवळ 3 आंतरराष्ट्रीय सामने खेळलो असताना धोनीने मला तू वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात असणार', अशी भविष्यवाणी केली होती. धोनीच्या या शब्दांनंतर माझं स्वप्न सत्यात अवतरलं होतं. विशेष म्हणजे हार्दिकला पहिल्याच षटकात 21 धावा आल्यानंतर त्याला तो भारतीय संघात कायम राहिल असं वाटलं नसताना हे असं झाल्यानंतर अधिकचं आनंद झाल्याचंही त्याने सांगितलं.
हार्दिकची आयपीएल 2022 मधील कामगिरी
यंदा हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार म्हणून उत्तम खेळत खेळाडू म्हणूनही चांगली कामगिरी केली. संघाला आयपीएल 2022 चं जेतेपद हार्दिकने मिळवून दिलं. शिवाय गुजरात टायटन्सकडून (GT) खेळताना हार्दिक पांड्याने 15 सामन्यात 487 रन केले आहेत. यावेळी त्याची सरासरी 44.27 असून स्ट्राइक रेट 131.26 इतका आहे. यावेळी त्याने 4 अर्धशतकं ठोकली असून 87 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तो उत्तमप्रकारे गोलंदाजी देखील करताना दिसून आला.
हे देखील वाचा-
- NZ vs ENG : मैदानात दिसली जो रुटची 'जादूगिरी', हात न लावता उभी केली बॅट, पाहा Video
- माझा आदर्श वकार युनूस नाही, तर बुमराह शमी आणि भुवनेश्वर' : उमरान मलिक
- Shocking: 'सचिनला आऊट नाही तर, जखमी करायचं होतं' शोएब अख्तरच्या वक्तव्यानं क्रिडाविश्वात खळबळ
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.