MS Dhoni : महेंद्रसिंग धोनी ठरला IPL च्या इतिहासातील सर्वोकृष्ट संघाचा कर्णधार, माजी क्रिकेटपटूंच्या पॅनेलने तयार केला आजवरचा सर्वांत मजबूत संघ
New Delhi : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलच्या इतिहासातील सर्वोकृष्ट संघाचा कर्णधार ठरवण्यात आले आहे. आयपीएल 2008 मध्ये सुरु झाला. आयपीएलच्या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी माजी क्रिकेटपटूंनी हा संघ बनवला आहे.
New Delhi : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलच्या इतिहासातील सर्वोकृष्ट संघाचा कर्णधार ठरवण्यात आले आहे. आयपीएल 2008 मध्ये सुरु झाला. आयपीएलच्या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी माजी क्रिकेटपटूंनी हा संघ बनवला आहे. 20 फेब्रुवारीला आयपीएलच्या पहिल्या निलावाला 16 वर्षे पूर्ण होणार आहेत. याच निमित्ताने स्ट्रार स्पोर्ट्सने आजवरच्या सर्वोकृष्ट टीम बनवली आहे.
वसीम आक्रम, मॅथ्यू हेडन यांचा पॅनेलमध्ये समावेश
स्टार स्पोर्टने माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि जवळपास 70 पत्रकारांच्या साहाय्याने सर्वोकृष्ट टीम बनवली आहे. या माजी क्रिकेटपटूंच्या पॅनेलमध्ये वसीम आक्रम, मॅथ्यू हेडन, डेल स्टेनसारखे दिग्गज क्रिकेटपटू सामील झाले होते.
The first ever IPL auction is completing 16 years and more than 16 Lakh votes across our social media handles have been tallied to reveal the 1️⃣5️⃣ ALL-TIME INCREDIBLE IPL Players and 1️⃣ Incredible Coach picked by FANS.🏏🤩
— Star Sports (@StarSportsIndia) February 18, 2024
Tune in to the special event - IPL Incredible 16 - on… pic.twitter.com/TfE0lToFhO
हे खेळाडू सर्वोकृष्ट टीमचा भाग
ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीर डेव्हिड वॉर्नर आणि भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली यांची सलामीवीराच्या रुपाने या टीममध्ये निवड करण्यात आली. तर ‘यूनिवर्सल बॉस’ क्रिस गेलला वन डाऊला ठेवण्यात आले. मध्यक्रमामध्ये सुरेश रैना, एबी डिव्हिलियर्स, सूर्यकुमार यादव आणि एम एस धोनी यांचा समावेश आहे. तर हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा आणि कायरना पोलार्ड यांना अष्टपैलू म्हणून संघात स्थान देण्यात आले.
राशिद खान, सुनिल नरेन फिरकीपटू
राशिद खान, सुनिल नरेन आणि युजवेंद्र चहल या फिरकीपटूंनाही संघात स्थान देण्यात आलय. तर लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह हे दोन गोलंदाज सर्वोकृष्ट संघाचा भाग ठरले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू स्ट्रार स्पोर्ट्शी बोलताना म्हणाला, कर्णधार म्हणून एम एस धोनीच्या नावावर सहमती मिळणे पक्के होते.
रोहितही चांगला कर्णधार मात्र...
वर्ल्डकप, आयपीएल आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी यामध्ये एम एस धोनीचे नैसर्गिक गुण दिसून आले. मैदानाच्या बाहेर आणि मैदानावरही त्याने सर्व बाबींचा योग्य पद्धतीने सामना केला,असे म्हणत टॉम मूडी यांनी धोनीच्या नेतृत्व गुणाबाबत भाष्य केलं. रोहित शर्माही अतिशय चांगला कर्णधार आहे. मात्र, मुंबई इंडियन्सकडे नेहमी अतिशय चांगले खेळाडू राहिले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या