एक्स्प्लोर

Mohammed Shami : पहिल्या 2 सामन्यांसाठी संघाची घोषणा; मुकेश कुमारला मिळाली संधी, मोहम्मद शमी बाहेर

Mohammed Shami Ranji Trophy : सध्या भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे. 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

West Bengal announces squad for Ranji Trophy 2024-25 Mohammed Shami : सध्या भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे. 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. यानंतर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हैदराबादमध्ये होणार आहे. दरम्यान, भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा रणजी करंडक असून त्यासाठी बंगालने आपला संघ जाहीर केला आहे. 

बंगालने 19 सदस्यीय संघाची घोषणा केली असून त्यात मुकेश कुमार, आकाश दीपचा समावेश करण्यात आला आहे. मात्र टीम इंडियाच्या दिग्गज गोलंदाजाच्या नावाचा समावेश नाही. बंगालने पहिल्या 2 सामन्यांसाठी आपला संघ जाहीर केला असून तिसऱ्या सामन्यासाठी संघात काही बदल केले जाऊ शकतात.

बंगाल संघात मोहम्मद शमीचे नाव नाही. 19 नोव्हेंबर 2023 रोजी एकदिवसीय वर्ल्ड कप फायनल झाल्यापासून शमी क्रिकेटपासून दूर आहे. भारतीय संघाचा आगामी ऑस्ट्रेलिया दौरा पाहता या अनुभवी गोलंदाजाचा संघात समावेश करणे अपेक्षित होते, परंतु क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने जाहीर केल्यानुसार पहिल्या दोन फेऱ्यांसाठी शमीचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, शमीचा भाऊ मोहम्मद कैफ संघाचा भाग आहे. रणजी ट्रॉफी 11 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून त्यात बंगालचा पहिला सामना उत्तर प्रदेशविरुद्ध लखनऊमध्ये होणार आहे.

मोहम्मद शमी रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळणार, अशीही याआधी अपेक्षा होती. स्वत: शमीनेही सांगितले होते की, लयीत येण्यासाठी तो देशांतर्गत क्रिकेटची मदत घेऊ शकतो. त्याच्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असणे खूप महत्वाचे आहे. याच कारणामुळे तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळू शकतो, असे मानले जात होते. मात्र, पहिल्या दोन सामन्यांसाठी जाहीर झालेल्या बंगालच्या संघात मोहम्मद शमीचे नाव नाही. ऋद्धिमान साहा, अभिमन्यू इसवरन, शाहबाज अहमद, अभिषेक पोरेल आणि मुकेश कुमार या खेळाडूंचा बंगाल संघात समावेश करण्यात आला आहे.

रणजी ट्रॉफीसाठी बंगालचा संघ -

अनुस्तुप मजुमदार (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, सुदीप घारामी, सुदीप चॅटर्जी, वृद्धिमान साहा, शाहबाज अहमद, अभिषेक पोरेल, हृतिक चॅटर्जी, एव्हलिन घोष, शुवम डे, आकाश दीप, मुकेश कुमार, सूरज जैस्वाल, मोहम्मद कैफ, प्रदीप कुमार, जी. , युधाजित गुहा, रोहित कुमार आणि ऋषव विवेक.

हे ही वाचा -

Hardik Pandya ICC T20 Rankings : आयसीसी क्रमवारीत हार्दिक पांड्याने घेतली गरुडझेप! थेट पोहोचला 'या' क्रमांकावर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special ReportNashik Accident | नाशिकमध्ये भीषण अपघात पाच जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Embed widget