एक्स्प्लोर

Sydney Terrorist Attack :अंदाधुंद गोळीबार, रेस्टॉरंटमध्ये लपला म्हणून क्रिकेटपटू वाचला, ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत समुद्रकिनाऱ्यावर मृतदेहांचा खच! नेमकं काय घडलं?

Sydney Terrorist Attack Marathi News : ऑस्ट्रेलियातल्या सिडनीतील बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर ज्यू नागरिक सण साजरा करत असताना दोन हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला.

Michael Vaughan Sydney Terrorist Attack News : ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरालगतच्या बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला आणि 42 जण जखमी झाले. बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर ज्यू नागरिक सण साजरा करत असताना दोन हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या नागरिकांमध्ये पळापळ सुरु झाली. मात्र काही वेळानं पोलिसांनी एका हल्लेखोराला गोळ्या घातल्या. तर दुसरा हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे.

अंदाधुंद गोळीबार, रेस्टॉरंटमध्ये लपला म्हणून क्रिकेटपटू वाचला (Sydney Terrorist Attack Michael Vaughan News)

दरम्यान, या अंदाधुंद गोळीबारत थोडक्यात बचावलेले इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांचे शब्द त्या थरारक क्षणांचं भयावह वास्तव मांडण्यासाठी पुरेसे आहेत.  हल्ल्याच्या वेळी मायकेल वॉन बॉन्डी बीच परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये उपस्थित होते. अचानक गोळीबाराचे आवाज लागल्यानंतर संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. 

वॉन यांनी सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर करत लिहिलं, “बॉन्डीमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये लॉक होणं अत्यंत भीतीदायक होतं. सुदैवाने मी आता सुरक्षित घरी पोहोचलो आहे. आपत्कालीन सेवांचे आणि त्या धाडसी व्यक्तीचे आभार, ज्याने दहशतवाद्याचा सामना केला. वॉन यांची ही प्रतिक्रिया त्या क्षणांतील दहशतीची साक्ष देणारी आहे, ज्यात असंख्य नागरिक आणि पर्यटक अडकले होते. वॉन यांनी ज्या धाडसी व्यक्तीचे आभार मानले, त्याच्या शौर्याचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती शूटरला मागून पकडताना, त्याच्या हातातून बंदूक हिसकावून घेताना स्पष्ट दिसतो.

ऑस्ट्रेलियन पोलिसांनी ही घटना दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट केलं आहे. न्यू साउथ वेल्सचे प्रीमियर क्रिस मिन्स यांनी सांगितलं की, हा हल्ला थेट सिडनीतील यहूदी समुदायाला टार्गेट करून करण्यात आला  आहे.  घटनास्थळावरून एक वाहन जप्त करण्यात आलं असून, त्यामध्ये इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाइस (IED) असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे बॉम्बनिरोधक पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी दोन हल्लेखोरांची ओळख पटवली असून, तिसऱ्या संशयिताच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे. नागरिकांनी संयम राखावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कार्यक्रमस्थळी एक हजाराहून अधिक लोक उपस्थित होते.

ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत समुद्रकिनाऱ्यावर मृतदेहांचा खच!  (Sydney Terrorist Attack Marathi News)

दरम्यान, रविवारी ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दाखवलेल्या हवाई दृश्यांमध्ये बॉन्डी बीचवर झाकलेले मृतदेहांचा खच, जखमींवर उपचार करत असलेले आपत्कालीन कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणावर तैनात असलेला पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला. पंतप्रधान अँथनी अल्बनीझ यांनी या घटनेला धक्कादायक आणि अत्यंत वेदनादायक असं संबोधत, लोकांचे प्राण वाचवणं आणि सुरक्षितता सुनिश्चित करणं हीच सध्या सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं सांगितलं.

हे ही वाचा -

Sydney Terrorist Attack: ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत दहशतवादी हल्ला, बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर मृतदेहांचा खच, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
Ishan Kishan News : 27 चौकार, 7 षटकार... 250 धावा ठोकल्या अन् अचानक मैदान सोडलं! ईशान किशनसोबत नेमकं काय घडलं? सगळेच घाबरले
27 चौकार, 7 षटकार... 250 धावा ठोकल्या अन् अचानक मैदान सोडलं! ईशान किशनसोबत नेमकं काय घडलं? सगळेच घाबरले
Ishan kishan Double Century : सगळे पाहत राहिले अन् ईशान किशन बरसत राहिला! फायनलमध्ये ठोकले द्विशतक, दिग्गजांच्या पंक्तीत बसत इतिहासाच्या पानावर नाव कोरलं
सगळे पाहत राहिले अन् ईशान किशन बरसत राहिला! फायनलमध्ये ठोकले द्विशतक, दिग्गजांच्या पंक्तीत बसत इतिहासाच्या पानावर नाव कोरलं
Hardik Pandya VIDEO : खांद्यावर हात अन्... हार्दिक पांड्या 18 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीबरोबर बंगळुरूच्या हॉटेलमध्ये दिसला, VIDEO
खांद्यावर हात अन्... हार्दिक पांड्या 18 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीबरोबर बंगळुरूच्या हॉटेलमध्ये दिसला, VIDEO

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget