Mayank Yadav : मयंक यादवची पहिल्याच सामन्यात झापूक झुपूक बॉलिंग, 150च्या स्पीडने मारा, अनेक विक्रम नावावर
ग्वाल्हेरच्या माधवराव सिंधिया स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव करत शानदार विजय मिळवला आहे.
India vs Bangladesh 1st T20I : ग्वाल्हेरच्या माधवराव सिंधिया स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव करत शानदार विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि शानदार गोलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 19.5 षटकात 127 धावांवर ऑआऊट झाला.
भारताकडून अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांनी अप्रतिम गोलंदाजी करत प्रत्येकी 3 बळी घेतले. फलंदाजीत संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांनी 29-29 धावा केल्या, तर हार्दिक पांड्याने नाबाद 39 धावा करत संघाला विजयापर्यंत नेले. भारताने 11.5 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसरा टी-20 सामना 9 ऑक्टोबरला दिल्लीत खेळवला जाणार आहे.
दरम्यान, भारताचा टी-20 पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज मयंक यादवने आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात एक मोठी कामगिरी केली आहे. ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने पहिल्या सामन्याच्या सहाव्या षटकात मेडन षटक टाकले. यासह त्याने अनोखा विक्रम आपल्या नावावर केला.
मयंक यादवने रचला इतिहास
पदार्पणाच्या सामन्यात मेडन षटक टाकणारा मयंक यादव हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी अजित आगरकर आणि अर्शदीप सिंग यांनीच केली होती. मयंकने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात ताशी 149.9 किमी वेगाने सर्वात वेगवान चेंडू टाकला.
टी-20I मध्ये पहिले मेडन ओव्हर टाकणारे भारतीय :
अजित आगरकर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - जोहान्सबर्ग 2006
अर्शदीप सिंग - भारत विरुद्ध इंग्लंड - साउथॅम्प्टन 2022
मयंक यादव - भारत विरुद्ध बांगलादेश - ग्वाल्हेर 2024
पहिली आंतरराष्ट्रीय विकेट
मयंकने त्याच्या दुसऱ्या षटकात पहिली आंतरराष्ट्रीय विकेट घेतली, जे भारताच्या डावातील आठवे षटक होते. बांगलादेशच्या महमुदुल्लाला डीप पॉइंटवर वॉशिंग्टन सुंदरकडे झेलबाद करून त्याने पहिला बळी घेतला.
The first of many more! ⚡️
— BCCI (@BCCI) October 6, 2024
📽️ WATCH Mayank Yadav's maiden international wicket 😎
Live - https://t.co/Q8cyP5jXLe#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Q0XvZGBQrq
मयंक यादवची आयपीएलमधील कामगिरी
लखनौ सुपर जायंट्सने फेब्रुवारी 2023 मध्ये मयंक यादवला 20 लाखांना विकत घेतले. दुखापतीमुळे तो 2023 च्या हंगामात खेळू शकला नसला तरी 2024 च्या आयपीएल हंगामात त्याने पंजाब किंग्जविरुद्ध पदार्पण केले. तेथे त्याने 27 धावांत 3 बळी घेतले.
मयंकचा आयपीएल 2024 मधील सर्वात वेगवान चेंडू रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध 156.7 किमी प्रतितास वेगाने नोंदवला गेला. एकूणच त्याने 4 आयपीएल सामने खेळले आणि 12.14 च्या सरासरीने 7 विकेट्स घेतल्या, 3/14 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
हे ही वाचा -