एक्स्प्लोर

IPL ऑक्शनमध्ये कोणत्याच संघमालकाने ढुंकूनही पाहिलं नाही, Unsold राहिला, पण त्याच खेळाडूकडे आता कर्णधारपद, KL राहुलचीही निवड

Karnataka Vijay Hazare Trophy Squad Marathi News : भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे.

Karnataka Vijay Hazare Trophy Squad : भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. तब्बल सहा वर्षांनंतर तो विजय हजारे ट्रॉफीत कर्नाटकच्या जर्सीत दिसणार आहे. विशेष बाब म्हणजे आयपीएल 2026 मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली केएल राहुल हा देशांतर्गत वनडे स्पर्धा खेळणार आहे.

कर्नाटकने संघाची घोषणा

अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत शुभमन गिलच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करणारा केएल राहुल आता देशांतर्गत क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. 33 वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज कर्नाटकच्या विजय हजारे ट्रॉफी 2025–26 च्या संघात निवडला गेला आहे. या स्पर्धेला 24 डिसेंबरपासून सुरुवात होणार असून, कर्नाटकने बुधवारी 17 डिसेंबर रोजी आपल्या संघाची घोषणा केली.

केएल राहुलसोबत प्रसिद्ध कृष्णालाही संघात स्थान

केएल राहुलसोबत वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णालाही संघात स्थान देण्यात आले आहे. प्रसिद्ध कृष्णा देखील अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा भाग होता. याशिवाय, देवदत्त पडिक्कलचीही कर्नाटक संघात पुनरागमन झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) नव्या धोरणानुसार आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, या भूमिकेला अनुसरूनच कर्नाटकचा हा निर्णय मानला जात आहे.

अनसोल्ड राहिला, पण त्याच अग्रवालकडे आता कर्णधारपद

यंदा विजय हजारे ट्रॉफीत कर्नाटक संघाची धुरा मयंक अग्रवालच्या खांद्यावर असणार आहे. विशेष म्हणजे, मयंक अग्रवाल आयपीएल 2026 मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. तर अनुभवी फलंदाज करुण नायरकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे केएल राहुल अनेक वर्षांनंतर मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली देशांतर्गत वनडे क्रिकेट खेळताना पाहायला मिळणार आहे.

विजय हजारे ट्रॉफीत कर्नाटकला ग्रुप-A मध्ये स्थान देण्यात आले असून, या गटात झारखंड, केरळ, तमिळनाडू, पुदुचेरी, त्रिपुरा, राजस्थान आणि मध्य प्रदेश हे संघ आहेत. कर्नाटक आपले सर्व गट सामने अहमदाबाद येथे खेळणार असून, त्यांचा पहिला सामना 24 डिसेंबर रोजी झारखंडविरुद्ध होणार आहे.

केएल राहुलची विजय हजारे ट्रॉफीमधील कामगिरी

केएल राहुलने अखेरचा विजय हजारे ट्रॉफी सामना 2019 मध्ये खेळला होता. 2010 ते 2019 या कालावधीत त्याने कर्नाटकसाठी या स्पर्धेत 42 सामने खेळले असून प्रत्येक डावात फलंदाजी केली आहे. या काळात राहुलने 44.97 च्या सरासरीने 1709 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 131 अशी आहे. त्याच्या नावावर चार शतके आणि 11 अर्धशतके नोंदलेली आहेत.

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 साठी कर्नाटकचा संघ :

मयंक अग्रवाल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, करुण नायर (उपकर्णधार), आर. स्मरण, केएल श्रीजीथ, अभिनव मनोहर, श्रेयस गोपाल, व्ही. वैशाख, मानवंथ कुमार एल, श्रीशा एस आचार, अभिलाष शेट्टी, शरथ बीआर, हर्षिल धर्मानी, ध्रुव प्रभाकर, केएल राहुल, प्रसिद्ध कृष्णा.

हे ही वाचा -

Aus vs Eng 3rd Test : ग्लेन मॅकग्राच्या डोळ्यांदेखत दुसऱ्या बॉलरने त्याचा विकेटसचा रेकॉर्ड मोडला, कॉमेंट्री करत असताना ताडकन उठला खुर्ची उचलली अन्... VIDEO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget