Mayank Agarwal: मयांक अग्रवालच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; पत्नी आशितानं दिला पहिल्या बाळाला जन्म
Mayank Agarwal welcomes baby boy with wife Aashita Sood: भारताचा स्टार फलंदाज मयांक अग्रवालच्या (Mayank Agarwal) घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालंय.

Mayank Agarwal welcomes baby boy with wife Aashita Sood: भारताचा स्टार फलंदाज मयांक अग्रवालच्या (Mayank Agarwal) घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालंय. मयांकची पत्नी आशिता सूदनं (Aashita Sood) त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिलाय. स्वत: मयांक अग्रवालनं आज ट्विटरवर त्याची पत्नी आणि मुलासोबतचा एक फोटो शेअर केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, मयांकच्या पत्नीनं 8 डिसेंबर 2022 लाच त्यांच्या बाळाला जन्म दिला. पण त्यानं ही माहिती फक्त आपल्या प्रियजनांना दिली होती.
नुकतीच मयांक अग्रवालनं ट्विटरवर एक पोस्ट केली. ज्यात त्यानं लिहिलंय की, "आम्ही कृतज्ञ अंतःकरणानं अयांशची ओळख करून देतो. प्रकाशाचा पहिला किरण, आमच्या परिवारातील एक भाग आणि देवाकडून मिळालेली भेट."
मयांक अग्रवालचं ट्वीट-
With our hearts full of gratitude, we introduce Aayansh ♥️
— Mayank Agarwal (@mayankcricket) December 11, 2022
The first Ray of light, a part of US & a Gift of God🧿🧿
08.12.2022 ♥️ pic.twitter.com/mPqW7FTSjl
मयांक- आशिताची प्रेम कहाणी
मयांकनं आशिताशी 4 जून 2018 रोजी लग्न केलं. यापूर्वी दोघेही सात वर्षे एकमेकांना डेट करत होते. बंगळुरूमध्ये त्यांच्या पालकांनी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीमध्ये दोघे पहिल्यांदा भेटले होते आणि ते पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले
मयांक अग्रवालची आंतरराष्ट्रीय कारकिर्द-
क्रिकेट | सामने | डाव | धावा | सर्वोच्च धावसंख्या | सरासरी | स्ट्राईक रेट | शतकं | अर्धशतकं |
---|---|---|---|---|---|---|---|---|
कसोटी | 21 | 36 | 1488 | 243 | 41.33 | 53.48 | 4 | 6 |
एकदिवसीय | 5 | 5 | 86 | 32 | 17.20 | 103.61 | 0 | 0 |
टी-20 | 185 | 179 | 4278 | 111 | 25.77 | 134.57 | 2 | 25 |
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
