LLC 2022: मोहम्मद कैफ, आरपी सिंह पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज; लीजेंड्स लीगमध्ये दाखवणार कमाल
LLC 2022: जागतिक टी-20 लीग लीजेंट्स लीगच्या दुसऱ्या हंगामात भारताचा माजी क्रिकेटपटू खेळताना दिसत आहे.
LLC 2022: जागतिक टी-20 लीग लीजेंट्स लीगच्या दुसऱ्या हंगामात भारताचा माजी क्रिकेटपटू खेळताना दिसत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) आणि माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंहनं (RP Singh) लीजेंड्स लीगच्या दुसऱ्या हंगामात खेळण्याचा निर्णय घेतलाय. या बहुचर्चित लीगमध्ये जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू खेळणार आहेत.
भारतात लीजेंड्स क्रिकेटचा दुसरा हंगाम भारतात खेळला जाणार आहे. लीजेंड्स लीगच्या दुसऱ्या हंगामात मोहम्मद कैफ आणि आरपी सिंह सहभागी होणार असल्यानं यंदाचा हंगाम भारतीय चाहत्यांसाठी आणखी मनोरंजक ठरणार आहे. लीजेंड्स लीगच्या पहिल्या हंगामातही दोन्ही खेळाडू सहभागी झाले होते.
दिग्गज क्रिकेटपटूंना लीगमध्ये जोडलं
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली, दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन, जॅक कॅलिस, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन, श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन, चामिंडा वास, इंग्लंडचा माँटी पानेसर आणि भारताचा वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, युसूफ पठाण, एस.बा. स्टुअर्ट बिन्नीसारख्या दिग्गज खेळाडूंना गेल्या आठवड्यात लीगमध्ये जोडलं होतं.
रमण रहेजा काय म्हणाले?
लीजेंड्स लीग क्रिकेटचे सह संस्थापक आणि सीईओ रमण रहेजा म्हणाले की, "मला खात्री आहे की, चाहत्यांच्या त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूला मैदानात पाहायला आवडेल. लीजेंड्स लीगच्या पहिल्या हंगामात आम्ही स्पर्धात्मक क्रिकेटर पाहिले. तसेच दुसऱ्या हंगामात उत्कृष्ट खेळाडूंचा सहभाग पाहण्यासाठी आम्ही उस्तुक आहेत. ज्यामुळं आणखी रोमांचक आणि मनोरंजक होईल."
लीजेंड्स क्रिकेट लीगचा दुसरा हंगाम भारतात
लीजेंड्स क्रिकेट लीगचा दुसरा हंगाम भारतात खेळला जाणार आहे. या लीगमध्ये इयान बटलर (न्यूझीलंड), मिशेल मॅक्लेनाघन (न्यूझीलंड), एल्टन चिंगुबुरा (झिम्बॉव्वे), धम्मिका प्रसाद (श्रीलंका) पारस खडका (नेपाळ), चमिंडा वास (श्रीलंका), क्रिस्टोफर मपोफू (झिम्बॉव्वे) आणि भारताचा लक्ष्मी रतन शुक्ला यासारखे खेळाडू खेळताना दिसणार आहेत. आम्ही या दिग्गज क्रिकेटपटूंचं लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये स्वागत करतो, असंही रमण रहेजा म्हणाले.
हे देखील वाचा-
- WI vs IND: पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूकडून अर्शदीप सिंहचं तोंडभरून कौतूक
- WI vs IND T20: वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ त्रिनिदादमध्ये दाखल
- Maharashtra Kustigir Parishad: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद निवडणूक बिनविरोध; रामदास तडस यांची अध्यक्षपदी निवड