Jasprit Bumrah: मोहम्मद शामी, दीपक चाहर की अन्य कोण? टी-20 विश्वचषकात 'हे' गोलंदाज घेऊ शकतात बुमराहची जागा
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आगामी टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारताला मोठा झटका लागलाय.
![Jasprit Bumrah: मोहम्मद शामी, दीपक चाहर की अन्य कोण? टी-20 विश्वचषकात 'हे' गोलंदाज घेऊ शकतात बुमराहची जागा Mohammed Shami, Deepak Chahar or anyone else? these bowlers in the T20 World Cup can replace Jasprit Bumrah Jasprit Bumrah: मोहम्मद शामी, दीपक चाहर की अन्य कोण? टी-20 विश्वचषकात 'हे' गोलंदाज घेऊ शकतात बुमराहची जागा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/3e357bba5158add6780a2fda2f2a32751664474840626266_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आगामी टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारताला मोठा झटका लागलाय. पीटीआयनं बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, पाठीच्या दुखापतीमुळं जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलाय. जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषकाला मुकणार असल्याच्या बातमीनं भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये निराशा पसरलीय.
जसप्रीत बुमराह भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहे. त्याचं बाहेर होणं कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय संघाचं टेन्शन वाढवू शकतं. महत्वाचं म्हणजे, त्याच्या जागेवर कोणत्या गोलंदाजाची भारतीय संघात निवड करायची? हा भारतीय क्रिकेट समितीसमोर पडलेला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. दरम्यान, जसप्रीत बुमराहच्या जागेवर कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते? यावर एक नजर टाकुयात.
मोहम्मद शामी
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीची टी-20 विश्वचषकाच्या भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीय. दरम्यान, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं मोहम्मद शामीला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेला मुकावं लागलंय. परंतु, मोहम्मद शामी कोरोनातून बरा झालाय, जी भारतीय संघासाठी चांगली गोष्ट आहे. जसप्रीत बुमराहची जागा घेणाऱ्या गोलंदाजाच्या शर्यतीत मोहम्मद शामी आघाडीवर आहे. मोहम्मद शामीचा अनुभव ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टींवर उपयोगी ठरू शकतो. शमीनं भारतासाठी अखेरचा टी-20 सामना गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात खेळला होता.
दीपक चाहर
मोहम्मद शामीसह दीपक चाहरचंही भारताच्या राखीव खेळाडूंच्या यादीत नाव आहे. नुकतीच पार पडलेल्या आशिया चषकातही दीपक चाहरला राखीव म्हणून संघात निवडण्यात आलं होतं. मात्र, आवेश खानची तब्येत खराब झाल्याने त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात दीपक चाहरनं भेदक गोलंदाजी केली. त्यानं चार षटकात 24 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, गोलंदाजीसह दीपक चहर फलंदाजीतही योगदान देऊ शकतं.
उमेश यादव, शार्दुल ठाकूरही शर्यतीत
मोहम्मद शमी आणि दीपक चहर यांच्याशिवाय उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर हेही चांगले पर्याय सिद्ध होऊ शकतात.मोहम्मद शमी कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर उमेश यादवची ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली. उमेशला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्यानं दोन विकेटस् घेतल्या. उमेशकडेही भरपूर अनुभव आहे आणि तो ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर प्रभावी ठरू शकतो.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)