एक्स्प्लोर

WPL 2023 : गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये सलामीचा सामना, महिला आयपीएल सामने कधी, कुठे पाहाल, वाचा सविस्तर

Womens IPL 2023 : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाची सुरुवात उद्या म्हणजेच 4 मार्चपासून होत आहे. यंदाच्या हंगामात एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत.

Women’s Premier League 2023 :  महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या हंगामाला सुरू होण्यासाठी 24 तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. या T20 लीगचा पहिला सामना उद्या म्हणजेच 4 मार्च रोजी गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स महिला संघ यांच्यात नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये खेळवला जाईल. या संपूर्ण हंगामाचे स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणारा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.

जर दोन्ही संघांबद्दल बोलायचं झालं तर त्यात उत्कृष्ट महिला खेळाडूंची नावे आपल्याला पाहायला मिळतील. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची दिग्गज खेळाडू बेथ मुनी गुजरात जायंट्स संघाची कर्णधारपदी विराजमान होणार आहे, तर हरमनप्रीत कौरकडे मुंबई इंडियन्स महिला संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. WPL ची पहिली आवृत्ती सुरू होण्याची सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते, जी प्रतिक्षा आता जवळपास संपली आहे. या पहिल्या आवृत्तीत एकूण 5 फ्रँचायझी सहभागी होत आहेत. ज्यामध्ये गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स महिला संघाव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघाचा समावेश आहे. 

कोणत्या खेळाडूंकडे नजरा?

पहिल्याया सामन्याबाबत दोन्ही संघातील प्रमुख खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर, ऍशले गार्डनर व्यतिरिक्त सोफी डंकले देखील गुजरात जायंट्स संघात खेळताना दिसणार आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सच्या महिला संघात हेली मॅथ्यूजशिवाय नताली सिव्हर ब्रंट आणि अमेलिया केर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

पहिल्या सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?

गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स महिला संघ यांच्यात खेळल्या गेलेल्या या हंगामातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.

कोणते संघ सहभाग घेत आहेत?

मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स हे संघ स्पर्धेत सहभागी होत असून सर्व सामने मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवले जातील. डीवाय पाटील स्टेडियमवर 11 सामने आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर 11 सामने होणार आहेत.

हे देखील वाचा-

WPL 2023 Schedule : महिला प्रीमियर लीग 2023 चं वेळापत्रक ते लाईव्ह स्ट्रीमिंग, A टू Z माहिती एका क्लिकवर 

महत्त्वाच्या बातम्या

Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
Ajinkya Rahane : यशस्वी जयस्वालचं करिअर संकटात होतं, 4 सामन्यांच्या बंदीच्या कारवाईतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणेनं गुपित सांगितलं
यशस्वी जयस्वालला त्यावेळी वाईट वाटलं असेल, 4 सामन्यांच्या बंदीतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणे म्हणाला... 
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
IND vs SL : श्रीलंकेने गेममध्ये आणला ट्विस्ट! 4 विकेट बाकी असतानाच डाव घोषित, भारतासमोर 207 धावांचं लक्ष्य, शुभमन गिलचा मोठा निर्णय
श्रीलंकेने गेममध्ये आणला ट्विस्ट! 4 विकेट बाकी असतानाच डाव घोषित, भारतासमोर 207 धावांचं लक्ष्य, शुभमन गिलचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget