IND vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूची अफलातून फिल्डिंग, पुजाराची घेतलेली कॅच पाहाच
IND vs SA, 3rd Test, Newlands Cricket Ground: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु आहे.
Ind vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील तिसरा कसोटी सामना सध्या रंगतदार स्थितीत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचे फलंदाज बाद होत असताना चेतेश्वर पुजारा मात्र एका अफलातून फिल्डिंगचा शिकार झाला आहे. पुजाराला आफ्रिकेच्या कीगन पीटरसनने झेलबाद केलं आहे. पीटरसन हा लेग स्लिपमध्ये फिल्डिंग करत होता. दरम्यान मार्कोच्या गोलंदाजीवेळी पुजाराने एक शॉट खेळला. ज्यावेळी पीटरसनने अगदी चित्त्याप्रमाणे झेप घेत कॅच पकडली या कॅचचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुजारा पुन्हा फेल
मागील काही काळापासून भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर खास कामगिरी करत नसल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्या कसोटीत केवळ अर्धशतक झळकावल्यानंतर या सामन्यात पहिल्या डावात 43 धावा केल्यानंतर पुजारा दुसऱ्या डावात केवळ नऊ धावाचं करु शकला आहे. सध्या भारत दुसरा डाव खेळत असून 52 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 161 वर सहा बाद आहे.
भारताचा पहिला डाव
सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजी घेतली. त्यानंतर सलामीवीर राहुल, मयांक आणि रहाणे स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर भारताचा अनुभवी पुजाराने 43 धावा केल्या खऱ्या पण तोही बाद झाला. त्यानंतर विराटने एका बाजूने मोर्चा सांभाळला पण त्याला कोणाची साथ न मिळाल्याने अखेर तोही 79 धावा करुन बाद झाला आणि भारताचा डाव 223 धावांवर आटोपला.
जसप्रीतचा 'पंच' आफ्रिका सर्वबाद
सामन्यात टिकून राहण्यासाठी भारतीय गोलंदाजाना चांगली कामगिरी करणं अनिवार्य होतं. त्यानुसार बुमराहने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत आफ्रिकेचे पाच गडी बाद केले.दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजानी भेदक मारा करत नऊ गडी तंबूत धाडले. यात बुमराहने 4, शमीने 2 आणि यादवने 2 तर शार्दूलने एक विकेट घेतली. आफ्रिकेकडून कीगन पीटरसनने सर्वाधिक 72 धावा केल्या. ज्यामुळे आफ्रिका 210 धावाच करु शकले आहेत.
हे देखील वाचा
- Virat Kohli : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत विराटचं अनोख 'शतक', अशा कामगिरी करणारा सहावा भारतीय
- IPL Title Sponsor: टाटा ग्रुप आयपीएलचे नवे टायटल स्पॉन्सर, अध्यक्ष ब्रजेश पटेल यांची घोषणा
- IPL Auction Update: यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दीक पंड्या कर्णधार? बंगळुरू, अहमदाबाद संघाची धुरा सांभाळणार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha