ENG vs NZ 1st Test: जो रूटची चमकदार खेळी! इंग्लंडनं लॉर्ड्स कसोटी जिंकली, मालिकेत 1-0 नं आघाडी
ENG vs NZ 1st Test Match: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला.
![ENG vs NZ 1st Test: जो रूटची चमकदार खेळी! इंग्लंडनं लॉर्ड्स कसोटी जिंकली, मालिकेत 1-0 नं आघाडी Eng vs NZ 1st Test: Joe Root's Unbeaten Ton Steers England To 5-Wicket Win Over New Zealand ENG vs NZ 1st Test: जो रूटची चमकदार खेळी! इंग्लंडनं लॉर्ड्स कसोटी जिंकली, मालिकेत 1-0 नं आघाडी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/05/e93cc9be97142412b7043e9ce0684a9b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ENG vs NZ 1st Test Match: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात यजमान इंग्लंडनं पाच विकेट्स राखून न्यूझीलंडचा पराभव केला. या विजयासह इंग्लंडच्या संघानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या लॉर्ड्स कसोटीतील चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच सामन्याचा निकाल लागला. कारण तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडला विजयासाठी फक्त 61 धावांची गरज होती. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटनं नाबाद 115 धावांची खेळी केली.
जो रूटची दमदार खेळी
लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 277 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. एकेकाळी न्यूझीलंडचा संघ हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेईल, असं वाटत असताना जो रूटनं संघाचा डाव सावरत इंग्लंडला विजय मिळवून दिला. रूटशिवाय कर्णधार बेन स्टोक्सनंही अर्धशतक झळकावलं. तर बेन फोक्सनं रुटसोबत चांगली भागीदारी करत संघासाठी 32 धावांचं योगदान दिलं.
इंग्लंडचं जोरदार कमबॅक
या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात 132 धावांत आटोपला होता. इंग्लंडचा संघही पहिल्या डावात केवळ 141 धावाच करू शकला. अशाप्रकारे यजमानांना केवळ 9 धावांची आघाडी मिळाली. तर दुसऱ्या डावात डॅरिल मिशेलच्या शतकी खेळीमुळं न्यूझीलंडसमोर 285 धावा करत इंग्लंडच्या संघासमोर 277 धावांचं लक्ष्य ठेवलं.
जो रूटच्या नावावर खास विक्रम
इंग्लंडसाठी सर्वात जलद 9,000 धावा करण्याचा विक्रम जो रूटच्या नावावर आहे. आता 10 हजार धावांचा आकडा गाठत त्यानं आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात जो रूटनं त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 26 वं शतक पूर्ण केलं. इंग्लंडसाठी 10,000 हजार धावांचा आकडा पार करणारा तो दुसरा फलंदाज आहे. रुटनं आपल्या 118व्या कसोटीत ही कामगिरी केली. तर, लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो जगातील 14वा फलंदाज आहे. याआधी अॅलेस्टर कूकनं इंग्लंडसाठी 10 हजार धावांचा टप्पा गाठला होता.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)