(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Joe Root ENG vs SL Test : जो रूटने भल्या भल्यांना फोडला घाम... लॉर्ड्सवर शतक झळकावून रचला इतिहास अन् मोडला 'हा' विक्रम
Joe Root Creates History : जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास अन्....
England vs Sri Lanka 2nd Test : कसोटी क्रिकेटमध्ये आता सध्या इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटचा तांडव पाहिला मिळत आहे. कारण श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत त्याने बॅक टू बॅक सेंच्युरी झळकावली. पहिल्या डावानंतर रूटने दुसऱ्या डावातही आश्चर्यकारक कामगिरी करत शानदार शतक झळकावले आणि यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.
जो रूट इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. रूटने ॲलिस्टर कूकचा विक्रम मोडला आहे. लंडनमधील लॉर्ड्सवर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात रूटने 103 धावा केल्या. या शतकी खेळीने त्याने कुकचा विक्रम मोडला. इंग्लंडने पहिल्या डावात 427 धावा केल्या होत्या. तर श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 196 धावा करून ऑलआऊट झाला होता.
ANOTHER CENTURY 💯
— ICC (@ICC) August 31, 2024
Unstoppable Joe Root ticks off another Test hundred 👏#WTC25 | #ENGvSL: https://t.co/2NMxcvYAH8 pic.twitter.com/DwwQ7rfhTB
लॉर्ड्स कसोटीत रूटने दमदार कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या डावातही शतक झळकावले. रूटने 143 धावांची इनिंग खेळली होती. यादरम्यान त्याने 206 चेंडूंचा सामना करत 18 चौकार मारले. आता दुसऱ्या डावातही त्याने शतक झळकावले आहे. रुटने 121 चेंडूंचा सामना करत 103 धावा केल्या. या खेळीत 10 चौकार मारले. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडने दुसऱ्या डावात सर्वबाद होईपर्यंत 251 धावा केल्या. या डावात हॅरी ब्रूकने 37 धावांचे योगदान दिले.
The perfect angle of Joe Root's record-breaking century doesn't exis- pic.twitter.com/zXeojPXpF0
— England Cricket (@englandcricket) August 31, 2024
रूटने मोडला कूकचा विक्रम
जो रूट इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 145 कसोटी सामन्यांमध्ये 34 शतके आणि 65 अर्धशतकेही झळकावली आहेत. रूटच्या आधी हा विक्रम ॲलिस्टर कुकच्या नावावर होता. कुकने 161 कसोटी सामन्यांमध्ये 33 शतके आणि 57 अर्धशतकेही केली आहेत. केविन पीटरसन इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 104 सामन्यांमध्ये 23 शतके आणि 35 अर्धशतकेही ठोकली आहेत.
Joe Root, England's top Test centurion 👑 pic.twitter.com/hg2JQk347Y
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 31, 2024
जो रूटने महान ग्रॅहम गूचचा विक्रमही मोडला
इंग्लंडच्या महान दिग्गजांपैकी एक ग्रॅहम गूचच्या नावावर एक अतिशय खास रेकॉर्ड होता. म्हणजे लॉर्ड्सवर सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज होता. त्यावर अनेक दशके गूचचे नाव लिहिले गेले. गूचने या मैदानावर खेळल्या गेलेल्या 21 कसोटी सामन्यांमध्ये 6 शतके, 5 अर्धशतके आणि 53.02 च्या सरासरीने 2015 धावा केल्या होत्या.
पण आता रूटने ग्रॅहम गूचचा 30 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. आतापर्यंत येथे खेळल्या गेलेल्या 22 कसोटींमध्ये रूटने 40 डाव, 7 शतके आणि अर्धशतकांसह 54.64 च्या सरासरीने 2022 धावा केल्या आहेत.