एक्स्प्लोर

IND vs BAN : अखेर जयदेव उनाडकट बांगलादेशला पोहोचला, दुसऱ्या कसोटीत उतरणार मैदानात, बीसीसीआयनं केलं स्वागत

India vs Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) कसोटी मालिकेत वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट 12 वर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन करणार आहे.

Jaydev Unadkat : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून (IND vs BAN Test Series) तब्बल 12 वर्षांनंतर भारताच्या कसोटी संघात डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) पुनरागमन करत आहे. पण पहिल्या कसोटीपूर्वी व्हिसा न मिळाल्याने जयदेव बांगलादेशला पोहचू शकला नाही. पण गुरुवारी (15 डिसेंबर) जयदेव बांगलादेशला पोहोचला असून कसोटी संघासोबत सामील झाला आहे. मोहम्मद शमीच्या जागी त्याला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. दरम्यान जयदेव बांगलादेशला पोहोचल्यावर टीम इंडियाने त्याचे जोरदार स्वागत केले.

यादरम्यान बीसीसीआयने ट्वीट करत फोटोही पोस्ट केला आहे. ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, Hey जयदेव उनाडकट, टीम इंडियामध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे. दरम्यान बांगलादेशला वेळेत पोहोचू न शकल्याने जयदेव पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. कसोटी संघात समावेश केल्यानंतर उनाडकटने सर्वांचे आभार मानले असून बीसीसीआयनं फोटो पोस्ट करत जयदेवचं स्वागत केलं आहे.

बीसीसीआयचं जयदेवसाठी वेलकम ट्वीट

शमीची दुखापत आणि जयदेवला संधी

भारताचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शामी दुखापतीमुळं बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडलाय. त्याच्या जागी जयदेव उनाडकटचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला. 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जयदेव उनाडकट भारतीय कसोटी संघाचा भाग बनलाय. त्यानं 2010 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये एकमेव कसोटी खेळली होती. जयदेवनं भारतासाठी आतापर्यंत 1 कसोटी, 7 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

पहिल्या कसोटी भारत आघाडीवर

झहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये (Zahur Ahmed Chowdhury Stadium) पहिला कसोटी सामना सुरु असून सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघ 404 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघाला दुसऱ्या दिवसाखेर 133 धावांवर 8 विकेट्स गमावले.बांगलादेशकडून मुशफिकूर रहीमनं (Mushfiqur Rahim) सर्वाधिक 28 धावांची खेळी केली. मेहंदी हसन (Mehidy Hasan Miraz) आणि इबादत हुसेन (Ebadot Hossain) क्रीजवर उपस्थित आहेत. भारताकडून कुलदीप यादवनं (Kuldeep Yadav) चमकदार गोलंदाजी केली.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

शुभमन गिल, हॅरी ब्रूक ते वैभव सूर्यवंशी, 'या' सात जणांना भविष्यात महान खेळाडू बनण्याची संधी  
शुभमन गिल, हॅरी ब्रूक ते वैभव सूर्यवंशी, 'या' सात जणांना भविष्यात महान खेळाडू बनण्याची संधी  
Ruturaj Gaikwad Century : नाबाद 101 धावा अन् अचानक डाव घोषित! ऋतुराज गायकवाडच्या शतकानंतर कर्णधार पृथ्वी शॉने असं का केलं?
नाबाद 101 धावा अन् अचानक डाव घोषित! ऋतुराज गायकवाडच्या शतकानंतर कर्णधार पृथ्वी शॉने असं का केलं?
MI IPL 2027 Retention List : हार्दिक पांड्यासह 12 खेळाडूंना मुंबई इंडियन्स देणार डच्चू? IPL च्या मिनी लिलावाआधी MI पलटनची संभाव्य रिटेंन्शन यादी
हार्दिक पांड्यासह 12 खेळाडूंना मुंबई इंडियन्स देणार डच्चू? IPL च्या मिनी लिलावाआधी MI पलटनची संभाव्य रिटेंन्शन यादी
IND vs NZ 1st T20 : टीम इंडियाच्या टी-20 सामन्याची वेळ बदलली! न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना किती वाजता रंगणार? टॉसपासून LIVE स्ट्रीमिंगपर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर
टीम इंडियाच्या टी-20 सामन्याची वेळ बदलली! न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना किती वाजता रंगणार? टॉसपासून LIVE स्ट्रीमिंगपर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Tiger Shroff : टायगर श्रॉफ नव्हे दुसराच सेलिब्रिटी टार्गेटवर होता, आरोपींनी रील्स पाहून प्लान बदलला,पोलीस तपासात धक्कादायक अपडेट समोर
टायगर श्रॉफ नव्हे दुसराच सेलिब्रिटी टार्गेटवर होता,पोलीस तपासात धक्कादायक अपडेट समोर
Eknath Shinde : पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? आम्ही ऑपरेशन सांगून नाही थेट करतो, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
2019 ला मतदारांनी शिवेसना भाजपला मतदान केलं, ते मविओसोबत गेले, ती सगळ्यात मोठी वोटचोरी: एकनाथ शिंदे
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
Ramdas Kadam: मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण? : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
Embed widget