(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs BAN 1st Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवसाखेर बांगलादेश 271 धावांनी पिछाडीवर; भारत मजबूत स्थितीत
Ind vs Ban, 1st Test Day 2 Stumps: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चट्टोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये (Zahur Ahmed Chowdhury Stadium) पहिला कसोटी सामना खेळला जातोय.
Ind vs Ban, 1st Test Day 2 Stumps: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चट्टोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये (Zahur Ahmed Chowdhury Stadium) पहिला कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघ 404 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघाला दुसऱ्या दिवसाखेर 133 धावांवर 8 विकेट्स गमावले.बांगलादेशकडून मुशफिकूर रहीमनं (Mushfiqur Rahim) सर्वाधिक 28 धावांची खेळी केली. मेहंदी हसन (Mehidy Hasan Miraz) आणि इबादत हुसेन (Ebadot Hossain) क्रीजवर उपस्थित आहेत. भारताकडून कुलदीप यादवनं (Kuldeep Yadav) चमकदार गोलंदाजी केली.
बांगलादेशचा पहिला डाव
भारताला 404 धावांवर रोखल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बांगलादेशच्या संघाची सुरुवात खराब झाली. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं पहिल्याच चेंडूवर नजमूल शांतोच्या रुपात बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्यानंतर उमेश यादवनं चौथ्या षटकात यासीर अलीची विकेट्स घेतली. लिटन दासही स्वस्तात माघारी परतला. बांगालादेशकडून मुशफिकूर रहीमनं सर्वाधिक 28 धावांची खेळी केली. याशिवाय, शाकीब अल हसन (3 धावा), नुरुल हसन (16 धावा) आणि तैजूल इस्लाम शून्यावर बाद झाला. बांगलादेशच्या संघानं दुसऱ्या दिवसाखेर 8 विकेट्स गमावून 133 धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, मोहम्मद सिराजनं तीन विकेट्स मिळवल्या. याशिवाय, उमेश यादवच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली.
ट्वीट-
That's Stumps on Day 2 of the first #BANvIND Test!
— BCCI (@BCCI) December 15, 2022
A dominating show with the ball by #TeamIndia! 👍👍
4⃣ wickets for @imkuldeep18
3⃣ wickets for @mdsirajofficial
1⃣ wicket for @y_umesh
Scorecard ▶️ https://t.co/CVZ44NpS5m pic.twitter.com/SkqzNIqlSj
भारताचा पहिला डाव
नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार केएल राहुल (22 धावा) आणि शुभमन गिल (20 धावा) स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर विराट कोहलीही अवघ्या एका धावेवर बाद झाला. भारतानं 48 धावांवर तीन विकेट्स गमावल्या. यानंतर चेतेश्वर पुजारानं संघाचा डाव सावरला.त्याला ऋषभ पंतचीही चांगली साथ मिळाली.भारताच्या डावातील 32 षटकात ऋषभ पंतच्या रुपात भारताला चौथा धक्का लागला. तो 46 धावा करून बाद झाला.त्यानतंर चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरनं संघाची धावसंख्या पुढं नेली. अखेरच्या सत्रात तैजूल इस्लामनं चेतेश्वर पुजाराला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.चेतेश्वर पुजारानं 90 धावांची उत्कृष्ट खेळी केली. दरम्यान, पहिल्या दिवशीच्या अखेरच्या चेंडूवर मेहंदी हसननं अक्षर पटेलला बाद केलं. श्रेयस अय्यर नाबाद 82 धावांसह क्रिजवर उभा आहे. पहिल्या दिवसाखेर भारतानं 6 विकेट्सच्या मोबदल्यात धाव फलकावर 278 धावा लावल्या आहेत. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आठव्या षटकातचं श्रेयस अय्यर बाद झाला. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादवनं संघाचा डाव सावरला. रविचंद्रन अश्विनं 58 तर, कुलदीप यादवनं 40 धावांचं योगदान दिलं. भारताचा पहिला डाव 404 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून तैजूल इस्लाम आणि मेहंदी हसननं प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या. तर, इबादत हुसेन आणि खालीद अहमदच्या खात्यात एक-एक विकेट जमा झाली.
बांगलादेशची प्लेईंग इलेव्हन:
झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम, यासिर अली, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, खालेद अहमद, इबादोत हुसेन.
भारताची प्लेईंग इलेव्हन:
शुभमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
हे देखील वाचा-