Jasprit Bumrah Injury Update : भारत-पाकिस्तान सामन्यातून जसप्रीत बुमराह बाहेर; चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाला मोठा धक्का! रोहित-गंभीर चिंतेत
Jasprit Bumrah Injury Champions Trophy 2025 : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची दुखापत भारतासाठी चिंतेचा विषय आहे.
Jasprit Bumrah Injury Big Update For Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फारसा वेळ राहिला नाही. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच केली जाईल. पण, त्याआधी अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची दुखापत भारतासाठी चिंतेचा विषय आहे. बुमराहच्या दुखापतीबाबत अनेक प्रकारच्या बातम्या सतत येत आहेत. आता आणखी एक मोठी अपडेट आली आहे, ज्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकू शकतो आणि तो मार्चपर्यंतच खेळण्यासाठी उपलब्ध असेल.
यापूर्वी, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जसप्रीत बुमराहची संघात निवड केली जाईल अशी बातमी आली होती. त्याला तंदुरुस्त होण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. जर जसप्रीत बुमराह वेळेवर तंदुरुस्त झाला तरच त्याची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मुख्य संघात निवड होईल. मात्र, आता बातमी येत आहे की तो फेब्रुवारीपर्यंत तंदुरुस्त होऊ शकणार नाही. याचा अर्थ जसप्रीत बुमराह भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात खेळू शकणार नाही.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेज सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह मार्चच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे तंदुरुस्त होईल.
🚨 NO BUMRAH FOR INDIA IN CT. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 12, 2025
- Jasprit Bumrah likely to miss the group stages of the 2025 Champions Trophy due to back swelling. (Express Sports). pic.twitter.com/anVmanCp4a
एका सूत्राने सांगितले की, जसप्रीत बुमराह पुनर्वसनासाठी एनसीएमध्ये जाणार आहे. त्याला फ्रॅक्चर नाही परंतु त्याच्या पाठीत थोडी सूज आहे. त्यामुळे एनसीए त्याच्यावर लक्ष ठेवेल. तो तिथे तीन आठवडे राहणार आहे. यानंतरही त्याला त्याच्या तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी एक किंवा दोन सामने खेळावे लागतील. यासाठी सराव सामने देखील आयोजित केले जाऊ शकतात.
जसप्रीत बुमराह सतत दुखापतीने त्रस्त आहे. यामुळे तो आयसीसीच्या काही प्रमुख स्पर्धांना मुकला आहे. तो 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपचा भाग नव्हता. याशिवाय, तो 2023 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना खेळू शकला नाही.
मोहम्मद शमी परतला
एकीकडे जसप्रीत बुमराहच्या बाहेर पडण्याच्या बातम्या समोर येत असताना, दुसरीकडे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी टीम इंडियामध्ये परतला आहे. शुक्रवारी (11 जानेवारी) बीसीसीआयने इंग्लंड टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. शमीचे नावही संघात समाविष्ट करण्यात आले. शमी सुमारे 14 महिन्यांनी टीम इंडियामध्ये परतला आहे.
हे ही वाचा -