Jasprit Bumrah Asia Cup 2023: टीम इंडियाला मोठा धक्का; आशिया कप स्पर्धेच्या मध्यातूनच बुमराह परतला घरी
Jasprit Bumrah Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या मध्यावर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आपल्या घरी परतला आहे.
![Jasprit Bumrah Asia Cup 2023: टीम इंडियाला मोठा धक्का; आशिया कप स्पर्धेच्या मध्यातूनच बुमराह परतला घरी jasprit bumrah back home before india vs nepal match in asia cup 2023 bumrah out to team india for some personal reasons Know detaisl Jasprit Bumrah Asia Cup 2023: टीम इंडियाला मोठा धक्का; आशिया कप स्पर्धेच्या मध्यातूनच बुमराह परतला घरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/16/3d68225bfd8cb1b659213f3259e343491692150489352786_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jasprit Bumrah Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या मध्यावर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ऐन स्पर्धेतून ब्रेक घेत आपल्या घरी परतला आहे. टीम इंडिया सोमवारी (4 सप्टेंबर) नेपाळविरुद्ध आशिया चषकातील आपला दुसरा सामना खेळणार आहे. परंतु, बुमराह मात्र नेपाळविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही.
दरम्यान, त्यातल्या त्यात चांगली बातमी अशी की, बुमराह लवकरच पुन्हा संघात सामील होणार आहे. तो नेपाळविरुद्धचा सामना खेळणार नाही. मात्र त्यानंतर तो सुपर-4 साठी भारतीय संघात पुन्हा सामील होणार आहे. बुमराह वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुमराहच्या घरी एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. म्हणजेच बुमराह आता बाबा होणार आहे. बुमराहनं 15 मार्च 2021 रोजी संजना गणेशनशी लग्न केलं होतं. संजना ही टीव्ही प्रेझेंटर आहे.
दुखापत झाल्यानंतर बुमराहचं संघात पुनरागमन
गेल्या काही दिवसांपासून बुमराह दुखापतीमुळे मैदानापासून दूर होता. आपल्या दुखापतीतून सावरत बुमराहनं आशिया कप स्पर्धेसाठी संघात पुनरागमन केलं आहे. बुमराहच्या पाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याचवर्षी मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये बुमराहवर शस्त्रक्रिया पार पडली होती. तेव्हापासूनच बुमराह मैदानापासून दूर होता. चाहते बुमराहच्या पुनरागमनाची आतुरतेनं वाट पाहत होते. आशिया कपसाठी घोषणा झालेल्या संघामध्ये बुमराहच्या नावाचा समावेश करण्यात आल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. पण आता अचनाक स्पर्धेतून घरी गेलेल्या बुमराहनं पुन्हा एकदा चाहत्यांची चिंता वाढवली आहे.
भारत-नेपाळ सामन्यात पावसाचा अंदाज
भारत आणि नेपाळ यांच्यात सोमवारी होणाऱ्या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पल्लेकल येथे दिवसाची सुरुवातच पावसाने होणा आहे. सकाळी आठ वाजता हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी दोन वाजता मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना तीन वाजता सुरु होणार आहे. अडीच वाजता नाणेफेक होणार आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. दुपारी पावसाने विश्रांती घेती नाही, तर नाणेफेकीला उशीर होईल. त्याशिवाय, दिवसभर पावसाने खोडा घातल्यास सामना रद्दही होऊ शकतो. डकवर्थ लुईस नियमांनुसार, प्रत्येकी 20-20 षटकांचा खेळ होणं गरजेचं आहे. पावसामुळे जितका वेळ वाया जाईल, तितके षटके कपात केली जाऊ शकतात. कँडीमध्ये सोमवारी सकाळी 60 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाणेफेकीवेळी म्हणजे दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान पावसाची शक्यता 22 टक्के इथकी आहे. पण संध्याकाळी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संध्याकाळी 66 टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्यात पावसाचा खेळ होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)