एक्स्प्लोर

मी आधी धोनीसाठी खेळलो, त्यानंतर देशासाठी; टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचं भावनिक वक्तव्य

Suresh Raina on MS Dhoni: 15 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी महेंद्रसिंह धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर अर्ध्या तासांत सुरेश रैनानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

Suresh Raina on MS Dhoni: 15 ऑगस्ट 2020 चा दिवस कोणताही भारतीय क्रिकेट चाहता कधीही विसरू शकत नाही. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यापाठोपाठच त्याच दिवशी टीम इंडियाचा ऑलराउंडर सुरेश रैनानंही (Suresh Raina) आपल्या निवृत्तीची घोषणा केली. 

त्यावेळी सुरेश रैना 33 वर्षांचा होता. निवृत्तीपूर्वी रैना बराच काळ भारतीय संघाबाहेर होता. पण धोनीसोबत त्यावेळी तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचाही महत्त्वाचा भाग होता. रैनानं त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर खेळलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान खेळला होता. 

आता सुरेश रैनानं धोनीनंतर काही वेळातच क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाचं कारण सांगितलं आहे. स्पोर्ट्स तकशी बोलताना रैनानं सांगितलंय की, आम्ही एकत्र खूप क्रिकेट खेळलो आहे. या बाबतीत मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मला धोनीसोबत टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये एकत्र खेळण्याची संधी मिळाली."

सुरेश रैना म्हणाले की, "माझी आणि एमएस धोनीची कहाणी सारखीच आहे. तो गाझियाबादसारख्या छोट्या शहरातून आला होता आणि एमएस धोनीही रांचीमधून आला होता. मी त्याच्यासोबत खूप क्रिकेट खेळलो, तो चेन्नई सुपर किंग्जसोबतही बराच काळ होता." पुढे बोलताना रैना म्हणाला की, "मी आधी धोनीसाठी खेळलो, त्यानंतर देशासाठी खेळलो. धोनी एक उत्कृष्ट लीडर आणि उत्तम माणूस आहे. त्याच्यासोबत माझं खूपच खास नातं आहे." 

कॅप्टन कूलनं जाहीर केलेली निवृत्ती 

15 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी 7.29 वाजता महेंद्रसिंह धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. एमएस धोनीच्या घोषणेनंतर काही वेळातच सुरेश रैनानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. 

टीम इंडियाचा ऑलराउंडर सुरेश रैना 

सुरेश रैनानं टीम इंडियासाठी 226 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 5 शतकं आणि 5615 धावा केल्यात. सुरेश रैनानंही 18 कसोटी खेळल्यात, ज्यात त्यानं एका शतकासह 768 धावा केल्या. तर 78 टी-20 सामन्यात 1604 धावा केल्या. सुरेश रैनानं भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Khelo India : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व, संयुक्ता काळेचा सुवर्ण चौकार

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND VS ENG 5th T20 : वैभव सूर्यवंशीसह 3 खेळाडू OUT? इंग्लंडविरुद्ध शेवटच्या टी-20 सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing XI
वैभव सूर्यवंशीसह 3 खेळाडू OUT? इंग्लंडविरुद्ध शेवटच्या टी-20 सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing XI
IND VS ENG 5th T20 : भारत-इंग्लंड शेवटच्या अन् पाचव्या टी-20 मॅचची वेळ बदलली; रात्री 10 वाजता नाही, तर... कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या A टू Z
भारत-इंग्लंड शेवटच्या अन् पाचव्या टी-20 मॅचची वेळ बदलली; रात्री 10 वाजता नाही, तर... कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या A टू Z
एकीकडे पराभव... दुसरीकडे ऑलिम्पिकचं तिकीट धोक्यात! सलग पराभवांनी टीम इंडियाची वाढवली धाकधूक; पाकिस्तान मारणार मोठी बाजी? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
एकीकडे पराभव... दुसरीकडे ऑलिम्पिकचं तिकीट धोक्यात! सलग पराभवांनी टीम इंडियाची वाढवली धाकधूक; पाकिस्तान मारणार मोठी बाजी? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: 64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
Dombivli: 'मला मारू नका...', मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिवाल डॉक्टरचाय मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
Embed widget