(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ishan Kishan: ईशान किशनची 200 धावांची वादळी खेळी; विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला!
Fastest 200 runs in ODI: बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs Bangladesh) भारताचा सलामीवीर ईशान किशननं (Ishan Kishan) अवघ्या 131 चेंडूत 210 धावांची खेळी करत इतिहास रचलाय.
Fastest 200 runs in ODI: बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs Bangladesh) भारताचा सलामीवीर ईशान किशननं (Ishan Kishan) अवघ्या 131 चेंडूत 210 धावांची खेळी करत इतिहास रचलाय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरलाय. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडीजचा (West Indies) विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर होता. त्यानं 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या (Zimbabwe) एकदिवसीय सामन्यात 138 चेंडूत 200 धावांचा शिखर गाठला होता. मात्र, बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशननं विक्रमी द्विशतक ठोकून जगासमोर आपली गुणवत्ता सिद्ध केली.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ईशान किशन टॉपवर गेलाय. त्यानं अवघ्या 126 चेंडूत हा पराक्रम केलाय. त्यानंतर या यादीत वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 138 चेंडूत 200 धावांचा टप्पा गाठलाय. 138 चेंडूसह वीरेंद्र सेहवाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सचिन तेडुलकर 147 चेंडूसह चौथ्या आणि पाकिस्तानचा फखर जमान 148 चेंडूसह पाचव्या क्रमांकावर आहे.
ट्वीट-
Ishan Kishan departs after scoring a stupendous 210 👏💯💯
— BCCI (@BCCI) December 10, 2022
Live - https://t.co/ZJFNuacDrS #BANvIND pic.twitter.com/oPHujSMCtY
एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक-
क्रमांक | फलंदाज | चेंडू |
1 | ईशान किशन (भारत) | 126 |
2 | ख्रिस गेल (वेस्ट इंडीज) | 138 |
3 | वीरेंद्र सेहवाग (भारत) | 140 |
4 | सचिन तेंडुलकर (भारत) | 147 |
5 | फखर जमान (पाकिस्तान) | 148 |
हे देखील वाचा-