IND vs BAN ODI Score Live Updates: भारताचा 227 धावांनी दणदणीत विजय
India tour Of Bangladesh: बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं (Team India) अतिशय निराशाजनक कामगिरी करून दाखवलीय.
LIVE
Background
India tour Of Bangladesh: बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं (Team India) अतिशय निराशाजनक कामगिरी करून दाखवलीय. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघानं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 असा पराभव स्वीकारावा लागलाय. या मालिकेतील तिसरा आज चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 38 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. आजवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात भारताचं पारडं दिसलंय. भारतानं 30 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, बांगलादेश संघाला फक्त 7 सामने जिंकता आले आहेत. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
कधी, कुठं रंगणार सामना?
भारत विरुद्ध बांगलादेश हा तिसरा एकदिवसीय सामना आज (10 डिसेंबर) रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, सकाळी 11. 30 वा सामन्याला सुरूवात होईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. हा बांगलादेशच्या चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच सोनी लिव (Sony Liv) अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे प्रत्येक लाईव्ह अपडेट्स पाहता येतील.
झहूर अहमद चौधरी स्टेडियमची खेळपट्टी कशी आहे?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमच्या खेळपट्टीवर होणार आहे. येथील खेळपट्टी नवीकोरी असल्यानं एक रंगतदार लढत होऊ शकते. बांगलादेशातील इतर कोणत्याही विकेटप्रमाणेच, ही खेळपट्टी देखील फिरकीपटूंना जास्त फायदा देणारी आहे. तर फलंदाजांना त्यांची लय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागेल. या मैदानावर एकदिवसीय सामन्यातील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या फक्त 216 धावांची आहे, यावरून एक लो स्कोरिंग मॅच आज होऊ शकते.
भारताचा एकदिवसीय संघ:
केएल राहुल (कर्णधार, विकेटकिपर), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव.
बांगलादेश एकदिवसीय संघ:
लिटन दास (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, यासिर अली, शकीब अल हसन, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराझ, अफिफ हुसैन ध्रुबो, इबादोत हुसेन, अनामूल हक, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), नुरुल हसन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, मुस्तफिजुर रहमान, आणि तस्किन अहमद.
हे देखील वाचा-