IND vs BAN 3rd ODI Playing 11: भारतीय संघात दोन मोठे बदल; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
IND vs BAN 3rd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चटोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) खेळला जातोय.
IND vs BAN 3rd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चटोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशा पिछाडीवर गेलेल्या भारतीय संघ आजचा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. याशिवाय, बांगलादेशच्या संघातही दोन बदल पाहायला मिळत आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि दीपक चाहर यांना विश्रांती देण्यात आलीय. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोघांनाही दुखापत झाली होती. त्यांच्याऐवजी ईशान किशन आणि कुलदीप यादवला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलंय.
ट्वीट-
🚨 Team News 🚨
— BCCI (@BCCI) December 10, 2022
2⃣ changes for #TeamIndia as @ishankishan51 & @imkuldeep18 are named in the team. #BANvIND
Follow the match 👉 https://t.co/HGnEqugMuM
A look at our Playing XI 🔽 pic.twitter.com/pZY5cfh8HR
ट्वीट-
TOYAM Sports Limited ODI Series: Bangladesh vs India: 3rd ODI
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 10, 2022
Bangladesh playing XI
For full match updates: https://t.co/81aCgkrnH0#BCB | #Cricket | #BANvIND pic.twitter.com/LfJweVmn4G
भारताची प्लेईंग इलेव्हन:
शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/ विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन:
अनामूल हक, लिटन दास (कर्णधार), यासिर अली, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकिपर), महमुदुल्ला, अफिफ हुसैन, मेहिदी हसन मिराझ, इबादोत हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद.
कधी, कुठं पाहायचा सामना?
भारत विरुद्ध बांगलादेश हा तिसरा एकदिवसीय सामना आज (10 डिसेंबर) रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, सकाळी 11. 30 वा सामन्याला सुरूवात होईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. हा बांगलादेशच्या चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच सोनी लिव (Sony Liv) अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे प्रत्येक लाईव्ह अपडेट्स पाहता येतील.
हे देखील वाचा-