Kevin O'Brien Retires: आयर्लंडचा स्टार ऑलराऊंडर केविन ओब्रायनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा!
Kevin O'Brien Retirement: आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू केविन ओब्रायननं (Kevin O'Brien) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्ती जाहीर केली.
Kevin O'Brien Retirement: आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू केविन ओब्रायननं (Kevin O'Brien) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्ती जाहीर केली. यासह 38 वर्षीय ओब्रायनची 16 वर्षांची कारकीर्द संपुष्टात आलीय. जून 2006 मध्ये एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या ओब्रायननं 3 कसोटी, 153 एकदिवसीय सामने आणि 110 टी-20 सामन्यांमध्ये आयर्लंडच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय.त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 हजार 850 धावा केल्या आणि 172 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतात 2011 मध्ये खेळण्यात आलेल्या विश्वचषकात केविन ओब्रायननं एक संस्मरणीय खेळी खेळली केली होती. या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 328 धावांचा पाठलाग करताना धमाकेदारी खेळी केली होती. त्यानं या सामन्यात 50 चेंडूत शतक ठोकून क्रिडाविश्वात छाप सोडली. ओब्रायनच्या झंझावत शतकी खेळीच्या जोरावर आयर्लंडनं इग्लंडचा पराभवही केला होता. एवढेच नव्हे तर, त्यानं पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पणाच्या सामन्यात पहिलं कसोटी शतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. केविन ओब्रायननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमेटमध्ये शतक झळकावलं आहे. आयसीसीच्या तिन्ही फॉरमेटमध्ये शतक झळकावणारा केविन ओब्रायन एकमेक आयर्लंडचा खेळाडू आहे.
ट्वीट-
आयर्लंडसाठी खेळताना प्रत्येक मिनिटाचा आनंद लुटलाय- केविन ओब्रायन
"आज मी 16 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. मी माझ्या देशासाठी 389 सामने खेळले आहेत. मला ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात माझी कारकीर्द संपवण्याची इच्छा होती.परंतु गेल्या वर्षीच्या विश्वचषकापासून मला खूप कमी संधी मिळाल्या. निवडकर्ते नव्या खेळाडूंना संधी देत आहेत. मी आयर्लंडसाठी खेळताना प्रत्येक मिनिटाचा आनंद लुटला आहे. मी मैदानात अनेक मित्र बनवले आहेत. राष्ट्रीय संघाकडून खेळताना माझ्याकडं अनेक आनंददायी आठवणी आहेत," असं केविन ओब्रायननं म्हटलंय.मी माझ्या आयुष्याच्या आणि माझ्या कारकिर्दीच्या पुढच्या टप्प्यावर आहे. वेळ योग्य आहे. मला येथे आयर्लंडमध्ये माझी स्वतःची कोचिंग अकादमी वाढवायची आहे आणि मला नजीकच्या भविष्यात काही रोमांचक संधी उपलब्ध आहेत. मला परदेशातही कोचिंगचा अनुभव मिळवणं सुरू ठेवायचं आहे.
मोठा भाऊही खेळलाय आयर्लंडसाठी क्रिकेट
केविन ओब्रायनचा मोठा भाऊ नियाल ओब्रायन हा देखील आयर्लंडकडून क्रिकेट खेळला आहे. नियाल आणि केविन बराच काळ एकत्र क्रिकेट खेळले. पॉल स्टर्लिंगनंतर 38 वर्षीय केविन ओब्रायन हा आयर्लंडसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1 हजार 973 धावांसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 2019 मध्ये, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केविनच्या बॅटमधून 729 धावा निघाल्या.
हे देखील वाचा-