एक्स्प्लोर

Irani Cup : यशस्वी जैस्वालचा डबल धमाका, आधी द्विशतक आणि नंतर शतक झळकावत खास रेकॉर्ड केला नावावर

Irani Cup 2022-23 : यशस्वी जैस्वालने मध्य प्रदेश विरुद्ध इराणी कप सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पहिल्या डावात द्विशतक झळकावणाऱ्या यशस्वीला दुसऱ्या डावातही शतक झळकावण्यात यश आलं आहे.

Yashasvi Jaiswal in Irani Cup : भारताचा युवा फलदाज यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) इराणी चषक स्पर्धेच्या पदार्पणाच्या सामन्यातच इतिहास रचला आहे. ग्वाल्हेरमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध पहिला सामना खेळणाऱ्या यशस्‍वीला दुसऱ्या डावातही शतक झळकावण्यात यश आलं. तो भारताच्या उर्वरित संघाचा भाग आहे. त्याच सामन्यातील पहिल्या डावात त्याने 213 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर दुसऱ्या डावातही शतक झळकावण्यात तो यशस्वी ठरला. इराणी चषकात एका सामन्यात द्विशतक आणि एक शतक झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

पहिल्या डावात द्विशतक झळकावलं

यशस्वी जैस्वालने मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात 259 चेंडूत 213 धावा केल्या. यादरम्यान त्याने 30 चौकार आणि 3 षटकार मारले. चमकदार फलंदाजी करताना त्याने मध्य प्रदेशच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं. पहिल्या डावात अभिमन्यू ईश्वरनला डावललं, तर इतर सर्व खेळाडूंनी बहुतांशी निराश केलं. यादरम्यान यशस्वी एका टोकाला जोरदार फटकेबाजी करत होता. दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या. त्याच्या या धडाकेबाज खेळीमुळे भारताच्या शेष संघाला पहिल्या डावात 484 धावा करता आल्या.

दुसऱ्या डावातही शतक झळकावलं

यशस्वी जैस्वालची झंझावाती फलंदाजी दुसऱ्या डावातही कायम राहिली. तिसऱ्या दिवशी संघाचा कर्णधार मयंक अग्रवाल खाते न उघडताच बाद झाला. अशा स्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या यशस्वी जैस्वालने पुन्हा दमदार फलंदाजी करत आघाडी घेतली. त्याने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 53 चेंडूत 58 धावा केल्या. सामन्याच्या चौथ्या दिवशी धडाकेबाज फलंदाजी करत त्याने दुसऱ्या डावातही आपलं शतक पूर्ण केलं. इराणी चषक सामन्याच्या दोन्ही डावात द्विशतक आणि शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. इराणी कपमध्ये एका सामन्यात 300 किंवा त्याहून अधिक धावा करणारा शिखर धवननंतरचा दुसरा भारतीय फलंदाज आहे. बातमी लिहीपर्यंत उर्वरित भारतीय संघाने दुसऱ्या डावात 7 विकेट गमावत 201 धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल नाबाद 121 आणि पुलकित नारंगने 1 धावा केल्या. ज्यामुळे उर्वरित भारत संघाने आतापर्यंत 391 धावांची आघाडी घेतली आहे.

इराणी ट्रॉफीसाठी भारताचा उर्वरित संघ-

मयंक अग्रवाल, सुदीप कुमार घरामी, यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, हार्विक देसाई, मुकेश कुमार, अतित सेठ, चेतन साकारिया, नवदीप सैनी, उपेंद्र यादव, मयंक मार्कंडे, सौरभ कुमार, आकाश दीप, बाबा इंद्रजित, पुलकित नारंग, यश धवल

इराणी ट्रॉफीसाठी मध्य प्रदेशचा संघ-

रजत पाटीदार, यश दुबे, हिमांशू मंत्री, हर्ष गवळी, शुभम शर्मा, व्यंकटेश अय्यर, अक्षत रघुवंशी, अमन सोलंकी, कुमार कार्तिकेय, सरांश जैन, आवेश खान, अंकित कुशवाह, गौरव यादव, अनुभव अग्रवाल, मिहिर हिरवाणी.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया कशी असेल?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Embed widget