IPL Retention: राहुल-हार्दिकबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता, आयपीएल संघ आज सोपवणार रिटेन खेळाडूंची यादी
IPL Retention: आयपीएलमधील आठ संघ आज, रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं बीसीसीआयकडे सोपवणार आहेत.
IPL Retention: रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी देण्याचा आज अखेरचा दिवस आहे. आयपीएलमधील आठ संघ आज, रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं बीसीसीआयकडे सोपवणार आहेत. जानावारीमध्ये हणाऱ्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघांनी आपले रिटेन खेळाडूंची यादी तयार केली आहे. आठ संघाना 4-4 खेळाडूंना रिटेन करण्याची संधी देण्यात आली आहे. अन्य दोन नव्या संघाना तीन खेळाडू निवडण्याची संधी देण्यात आली आहे. रोहित शर्मा, एम.एस. धोनी, विराट कोहली, ऋषभ पंत यांना आपले संघ कायम ठेवतील. पण, के. एल राहुल, हार्दिक पांड्या, सुरेश रैना आणि डेविड वॉर्नर यासारखे खेळाडू लिलिवात असू शकतात. सर्व संघ मंगळवारी सायंकाळपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयडे देतील. त्यानंतर 25 डिसेंबरपर्यंत आयपीएलचे दोन नवीन संघ तीन खेळाडूंना आपल्या संघात घेऊ शकतात.
रिटेशनचे नियम काय आहेत?
प्रत्येक संघ चार खेळाडूंना रिटेन करु शकतो. यामध्ये दोनपेक्षा जास्त विदेशी खेळाडू नसतील असं बीसीसीआयने सांगितलेय. म्हणजे, 2 भारतीय 2 विदेशी अथवा तीन भारतीय एक विदेशी... अशा प्रकारे आपल्या संघातील खेळाडू रिटेन करण्याचे अधिकार आयपीएल संघाला देण्यात आले आहेत.
रिटेशन केलेल्या खेळाडूसाठी किती रक्कम?
बीसीसआयने यंदा प्रत्येक संघाला लिलिवात खेळाडू खरेदी करण्यासाठी 90 कोटी रुपये दिले आहेत. रिटेशनमध्ये खेळाडू खरेदी केल्यास यामधून रक्कम वजा होईल. पहिल्या रिटेशनसाठी 16 कोटी, दुसऱ्या रिटेशनसाठी 12 कोटी, तिसऱ्या रिटेशनसाठी 8 आणि चौथ्या रिटेशनसाठी 6 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.
कोणता संघ कुणाला रिटेन करणार?
रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र प्रसारमाध्यमांनी आपल्या सूत्रांच्या हवाल्यानं काही नावं प्रसिद्ध केली आहेत. त्यानुसार काही दिग्गज खेळाडूंना संघानी रिटेन केलेलं नाही. नियमाअभावी काही दिग्गजांना संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. पाहूयात कोणता संघ कोणत्या खेळाडूला रिटेन करु शकतो....
मुंबई इंडियन्स –
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड, इशान किशन/सूर्यकुमार यादव
दिल्ली कॅपिट्लस –
ऋषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, नॉर्त्जे
चेन्नई सुपरकिंग्ज –
एम.एस. धोनी, ऋतुराज गायकवाड, रविंद्र जाडेजा, मोईन अली/सॅम करन
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु
विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, यजुवेंद्र चहल, देवदत्त पडीकल/हर्षल पटेल
राजस्थान रॉयल –
संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, चेतन सकारिया
पंजाब किंग्ज –
एकाही खेळाडूला रिटेन करणार नाही.
कोलकाता नाईट रायडर्स –
रसेल, सुनिल नारायण, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर
सनरायजर्स हैदराबाद –
केन विल्यमसन, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, अब्दुल समद