5 जणांसाठी काहीपण! आयपीएलच्या मेगा लिलावात सर्व रेकॉर्ड मोडणार; फ्रँचायझी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडणार
IPL Mega Auction: आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाची सर्वंच संघांनी तयारी सुरु केली आहे.
IPL Mega Auction: आयपीएल 2025 च्या मेगा लिलावासाठी सर्वंच संघांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान या आयपीएल लिलावात अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडू शकतो. तथापि, आज आपण त्या 5 खेळाडूंबद्दल पाहू जे, जर ते लिलावात सामील झाले, तर फ्रँचायझी कितीही मोठी रक्कम देण्यास तयार होऊ शकते.
1. रोहित शर्मा-
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या रोहित शर्माबद्दल सातत्याने वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिलीज करु शकते. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विक्रमी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. पण यावेळी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रोहित शर्मा लिलावात भाग घेणार की नाही? जर रोहित शर्मा लिलावात सामील झाला तर रोहित शर्मावर पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2. फिल सॉल्ट-
आयपीएलमध्ये फिल सॉल्टने जवळपास प्रत्येक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला धडाकेबाज सुरुवात केली. कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात फिल सॉल्टचा मोठा वाटा होता. पण यावेळी कोलकाता नाईट रायडर्सला लिलावापूर्वी फिल सॉल्ट रामराम करु शकतो.
3. ट्रॅव्हिस हेड-
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड सध्या इंग्लंडविरुद्ध शानदार फलंदाजी करत आहे. आयपीएल 2024 हंगामात ट्रॅव्हिस हेडने सनरायझर्स हैदराबादसाठी उत्कृष्ट फलंदाजी केली. ट्रॅव्हिस हेड लिलावात सहभागी झाल्यास पैशांचा पाऊस पडू शकतो हे मात्र निश्चित.
4. मिचेल स्टार्क-
आयपीएल 2024 च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला विक्रमी 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले. अशा प्रकारे मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. मात्र, या मोसमात मिचेल स्टार्कची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स मिचेल स्टार्कला संघातून डच्चू देणार असल्याची चर्चा रंगली आहे. मिचेल स्टार्क लिलावात सामील झाल्यास त्यावर पुन्हा मोठी बोली लागू शकते.
5. सॅम करन-
आयपीएल 2024 च्या हंगामात शिखर धवनच्या अनुपस्थितीत सॅम करनने पंजाब किंग्जचे नेतृत्व केले, परंतु त्याची कामगिरी चांगली नव्हती. पंजाब किंग्जने सॅम करनला करारबद्ध करण्यासाठी मोठी रक्कम खर्च केली होती, परंतु या अष्टपैलू खेळाडूने त्याच्या कामगिरीने निराश केले. त्यामुळे पंजाब किंग्जची फ्रँचायझी सॅम करनला संघातून रिलीज करु शकते.
संबंधित बातमी:
भारताचा संघ आमच्यापेक्षा...; पाकिस्तानला लोळवल्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराचा टीम इंडियालाही इशारा