IPL 2025 : ज्याला कोणी नाही त्याला आधार देणार MS धोनी! 4 वर्षांनंतर CSK मध्ये परतणार दिग्गज? लिलावात पडणार पैशांचा पाऊस
आयपीएल मेगा लिलावातपुर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांचा कर्णधाराला सोडले.
Faf du Plessis Possible Return In CSK : आयपीएल मेगा लिलावातपुर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला सोडले आहे. आता फाफ डू प्लेसिस मेगा लिलावाचा भाग असेल. आता असे मानले जात आहे की चेन्नई सुपर किंग्स आयपीएल मेगा लिलावात त्यांचा जुना खेळाडू फाफ डू प्लेसिसवर बोली लावू शकते. त्यामुळे तब्बल 4 वर्षांनंतर फाफ डु प्लेसिस चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीत दिसू शकतो. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल लिलाव 2021 पूर्वी फाफ डू प्लेसिसला सोडले होते. याआधी फाफ डू प्लेसिस महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता.
Faf Du Plessis for RCB! ❣️
— IPLnCricket: Everything about Cricket (@IPLnCricket) November 1, 2024
Innings - 45
Runs - 1636
Average - 38.05
SR - 146.99
50s - 15
100s - 0
HS - 96 pic.twitter.com/8jDOjqxjvF
आयपीएल मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्ज फाफ डू प्लेसिसवर चांगली रक्कम खर्च करू शकते, असे मानले जात आहे. फाफ डू प्लेसिस आणि चेन्नई सुपर किंग्जचे नाते फार जुने आहे. फाफ डू प्लेसिसने चेन्नई सुपर किंग्जसाठी अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. त्याच वेळी, आयपीएल मेगा लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने त्यांचा सलामीवीर ड्वेन कॉनवेला सोडले. आता चेन्नई सुपर किंग्जला सलामीवीराची गरज आहे. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्जसाठी फाफ डू प्लेसिस चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्ज फाफ डू प्लेसिससाठी बोली लावते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
HOMECOMING???#FafduPlessis #CSK pic.twitter.com/bypHfEHzcn
— Khushi | ಖುಷಿ | खुशी 🇮🇳 (@Khushi_Be) November 1, 2024
चेन्नई सुपर किंग्स व्यतिरिक्त फाफ डू प्लेसिस आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूरकडून खेळला आहे. आयपीएल 2021 लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने फाफ डू प्लेसिसला सोडले होते. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फाफ डू प्लेसिसला कर्णधार बनवले. फाफ डू प्लेसिसने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 4 हंगाम खेळले. तसेच तो पुन्हा एकदा त्याच्या जुन्या टीमचा भाग होऊ शकतो अशी चर्चा आहे.
हे ही वाचा -