IPL 2022: शिखर धवन की मयांक अग्रवाल? पंजाबच्या संघाचं नेतृत्व कोणाकडं? फ्रँचायझीकडून नव्या कॅप्टनची घोषणा
Panjab New Capatain: आयपीएलच्या मागच्या हंगामात केएल राहुलनं पंजाबच्या संघाचं कमान संभाळली होती. मात्र, त्यानं पंजाबच्या संघाची साथ सोडली आणि लखनऊच्या संघात सामील होण्याचा निर्णय घेतला.
Panjab New Capatain: आयपीएल संघ पंजाब किंग्जनं मयंक (Mayank Agarwal) अग्रवालची नवा कर्णधार म्हणून नियुक्त केलीय. मयंक अग्रवालच्या आधी लोकेश राहुल (KL Rahul) या संघाचा कर्णधार होता. अग्रवालनं यापूर्वी कोणत्याही आयपीएल संघाचं नेतृत्व केलेले नाही. मात्र, या मोसमात तो आधीच कर्णधार मानला जात होता. महत्वाचं म्हणजे, पंजाबच्या संघानं आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये भारताची तडाखेबाज फलंदाज शिखर धवनला (Shikhar Dhawan) विकत घेतलं. ज्यामुळं पंजाबच्या संघाच्या कर्णधारपद शिखर धवनकडं सोपवण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र, मयांक अग्रवाल पंजाबच्या संघाचं नेतृत्व करणार असल्याचं फ्रँचायझीनं स्पष्ट केलंय.
आयपीएलच्या मागच्या हंगामात केएल राहुलनं पंजाबच्या संघाचं कमान संभाळली होती. मात्र, त्यानं पंजाबच्या संघाची साथ सोडली आणि लखनऊच्या संघात सामील होण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी पंजाबच्या संघानं मयांक अग्रवालसह अनकॅप्ड वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला कायम ठेवण्यात आलं. यानंतर मयंकचे कर्णधारपद निश्चित असल्याचे मानले जात होते. परंतु, शिखर धवननं आयपीएलच्या मागच्या हंगामात दिल्लीच्या संघाचं प्रतिनिधीत्व केलंय. शिखर धवन आयपीएल २०२२मध्ये पंजाब किंग्सचे नेतृत्व करू शकतो. ज्यामुळं फ्रँचायझी शिखर धवनकडं कर्णधाराची जबाबदारी देईल, असं म्हटलं जात होतं. कारण, अग्रवालने यापूर्वी कोणत्याही आयपीएल संघाचे नेतृत्व केलेले नाही. मात्र, तरीही पंजाबच्या संघानं त्याच्यावर विश्वास दाखवलाय.
पंजाब किंग्जचा संघ:
मयंक अग्रवाल (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, संदीप शर्मा, बलतेज सिंह, कागिसो रबाडा, आर. चॅटर्जी, शाहरुख खान, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, नॅथन एलिस, प्रेरक मंकड, इशान पोरेल, राहुल चहर, अथर्व तायडे, अर्शदीप सिंह, प्रभसिमरन सिंह, हरप्रीत ब्रार, वैभव अरोरा, अंश पटेल, राज अंगद बावा, बेनी हॉवेल, शिखर धवन, ऋषी धवन, जॉनी बेअरस्टो, भानुका राजपक्षे.
हे देखील वाचा-
- Shreyas Iyer : तीन सामने, तीन अर्धशतकं, श्रेयस अय्यरनं विराटला टाकलं मागे
- IND vs WI, 3rd T20 : श्रेयस अय्यरचं धडाकेबाज अर्धशतक, भारताचा 6 विकेट्सनी विजय, श्रीलंकेला दिला व्हाईट वॉश
- AUS vs PAK : 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानमध्ये दाखल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha