AUS vs PAK : 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानमध्ये दाखल
Australia Tour of Pakistan : तब्बल 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. रविवारी सकाळी ऑस्ट्रेलियाचा संघ इस्लामाबाद विमानतळावर पोहचला.
Australia Tour of Pakistan : तब्बल 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. रविवारी सकाळी ऑस्ट्रेलियाचा संघ इस्लामाबाद विमानतळावर पोहचला. ऑस्ट्रेलिया संघ आणि सपोर्टिंग स्टाफसह 35 सदस्यांचा संघ पाकिस्तानमध्ये पोहचला आहे. पाकिस्तानमध्ये पोहचल्यानंतर कसोटी कर्णधान पॅट कमिन्सने (Pat Cummins) तेथील सुरक्षा व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले. तसेच आम्ही येथे सुरक्षित असल्याचे सांगितले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करत ऑस्ट्रेलिया संघाचे स्वागत केले आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियन संघ सहा आठवडे पाकिस्तानात वास्तव्य करणार आहे. पाकिस्तान दौऱ्यात ऑस्ट्रेलिया तीन कसोटी, एक टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, 27 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाचा संघ इस्लामाबादमध्ये पोहचणार. त्यानंतर एक दिवसाचा विलगीकरणाचा कालवधी पूर्ण करेल. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाच्या सहमतीनुसार, चार्टड प्लेनमधून पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ घरीच विलगीकरणाचा कालवाधी पूर्ण करेल. इस्लामाबादमध्ये एक दिवसाचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ रावळपिंडी क्रिकेट ग्राऊंडवर सराव सुरु करणार आहे.
Welcome @patcummins30
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 27, 2022
Great to have you and the Australian side here.#PAKvAUS #BoysAreReady 👊👊 pic.twitter.com/9odDz0p7E2
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान चार मार्चपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर तीन सामन्याची एकदिवसीय मालिका होणार आहे. तर एक टी-20 सामनाही होणार आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये पोहचल्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलिया संघाचे फोटो टि्वटरवर पोस्ट केले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्याचं वेळापत्रक (Australia Tour of Pakistan )
4 मार्च ते 8 मार्च - पहिला कसोटी सामना, रावळपिंडी
12 मार्च ते16 मार्च - दूसरा कसोटी सामना, कराची
21मारच ते 25 मार्च - तीसरा कसोटी सामना, लाहोर
29 मार्च - पहिला एकदिवसीय सामना, रावळपिंडी
31 मार्च - दूसरा एकदिवसीय सामना, रावळपिंडी
2 एप्रिल - तीसरा एकदिवसीय सामना, रावळपिंडी
5 एप्रिल - टी20 सामना, रावळपिंडी