एक्स्प्लोर

Hardik Pandya Wedding: लग्नासाठी हार्दिक पांड्या कुटुंबासह पोहोचला उदयपूरला, कोणकोणते फंक्शन्स होणार?   

Hardik Pandya Natasa Stankovic: हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक त्यांच्या लग्नासाठी कुटुंबासह उदयपूरला पोहोचले आहेत.

Hardik Pandya : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा लग्नासाठी सज्ज झाला आहे. तो पुन्हा एकदा त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबतच लग्न करणार आहे, पण यावेळी पद्धत वेगळी आहे. यावेळी हार्दिक आणि नताशाचा विवाह उदयपूरमध्ये होणार आहे. दोघांच्या लग्नाला कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. लग्नाआधी हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टॅनकोविक आपल्या कुटुंबासह उदयपूरला पोहोचले आहेत.

हार्दिकच्या लग्नाआधी मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रमही होणार आहे. यानंतर हे जोडपे आज म्हणजेच 14 फेब्रुवारीला खास  व्हॅलेंटाइन डेला पुन्हा एकदा लग्न करणार आहेत. लग्नासाठी दोघांचे कुटुंबीय उदयपूरला पोहोचले आहेत. सर्वजणांसाठी आलिशान हॉटेल बुक करण्यात आलं आहे. मात्र या लग्नाबाबत हार्दिक किंवा नताशाच्या वतीने कोणताही खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. लग्नातील काही उत्सव हिंदू परंपरेनुसार देखील केले जातील.

पुन्हा एकदा हार्दिक अडकणार लग्नबंधनात

31 मे 2020 रोजी हार्दिक आणि नताशाचे लग्न झाले, जेव्हा दोघांनी कोर्ट मॅरेज करून एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आता हे जोडपे त्यांचे लग्न भव्य आणि रॉयल पद्धतीने करण्याचा विचार करत आहे. याआधी दोघांनीही घाईघाईत लग्न केलं होतं. पण यावेळी दोघांनी आपल्या लग्नासाठी उदयपूरमधील एक सुंदर पॅलेस निवडलं आहे. लग्नात पाहुण्यांसमोर राजस्थानी आणि गुजराती खाद्यपदार्थ सादर केले जाणार आहेत.

टीम इंडिया सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यात व्यस्त

विशेष म्हणजे टीम इंडिया सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसारखी महत्त्वाची मालिका खेळत आहे. संघाने ट्रॉफीचा पहिला सामना जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. पण हार्दिक पांड्याचा कसोटी संघात समावेश नसून त्याने आतापर्यंत केवळ 11 कसोटी सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत हार्दिकसाठी पुन्हा लग्न करण्याची हीच योग्य वेळ आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया भारत एकदिवसीय सामने होणार असून त्यात हार्दिक संघात असू शकतो.

कोण आहे हार्दिकची पत्नी नताशा?

कोरोना काळात हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक लग्नबंधनात अडकले होते. नताशा स्टॅनकोविक बॉलिवूड अभिनेत्री आहे. नताशा ही सर्बियन मॉडल आणि अभिनेत्री आहे. प्रकाश झा यांच्या सत्याग्रह सिनेमातून नताशानं बॉलिवूड डेब्यू केला होता. बिग बॉस सिझन 8 आणि रॅपर बादशाहच्या डिजे वाले बाबू मेरा गाना चला दे, या गाण्यातून नताशा प्रकाशझोतात आली होती. डान्स रिअॅलिटी शो नच बलिएमध्येही नताशा अली गोणीसोबत सहभागी झाली होती. 2012 मध्ये अभिनयात करिअर करण्यासाठी भारतात आलेल्या नताशाने शाहरुख खानच्या झीरो सिनेमातही छोटी भूमिका साकारली होती.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
Embed widget