IndW vs SLW, 3rd T20I : भारतीय महिला संघाचं क्लीन स्वीपचं स्वप्न भंगलं, अखेरच्या सामन्यात 7 विकेट्सने श्रीलंका विजय
SL vs IND: तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाला श्रीलंकेनं मात दिली आहे. पण मालिका मात्र भारताने 2-1 ने जिंकली आहे.
SL vs IND: भारत आणि श्रीलंकेच्या महिला संघामध्ये सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरचा सामना नुकताच पार पडला. या सामन्यात श्रीलंका संघाने 7 विकेट्सने विजय मिळवत मालिकेचा शेवट गोड केला आहे. पण आधीच दोन सामने जिंकल्याने मालिका भारताने जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा डाव 138 धावांवरच आटोपला. ज्यानंतर 139 धावांचे लक्ष्य श्रीलंका संघाने तीन विकेट्सच्या बदल्यात 17 षटकात पूर्ण करत सामना जिंकला.
सामन्यात सर्वात आधी भारतीय महिलांना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. पण सुरुवातीपासून महिला संघ अडचणीत दिसत होता. मंधाना आणि मेघना यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. तर सर्वाधिक धावा म्हणजे हरमनप्रीतने 39 आणि जेमिमाने 33 धावा केल्या. याशिवाय इतर फलंदाज फेल झाल्यामुळे 20 षटकात 138 धावाच स्कोरबोर्डवर लागल्या. या धावा श्रीलंकेनं चामिरा अथूपट्टूच्या दमदार नाबाद 80 धावा केल्या. तिच्याच जोरावर संघानं 17 षटकात तीन गडी गमावत विजय मिळवला. तिलाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
अशी पार पडली मालिका
डंबुलाच्या रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं श्रीलंकेवर 34 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय महिला संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून श्रीलंकेसमोर 138 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 20 षटकात 104 धावा करू शकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघानं श्रीलंकेचा पाच विकेट्सनं पराभव केला होता. या विजयासह भारतीय संघान टी-20 मालिकेवर 2-0 नं कब्जा केला. दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रीलंकेच्या संघानं 20 षटकात सात विकेट्स गमावून भारतासमोर 126 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं पाच विकेट्स राखून सामना जिंकला.
हे देखील वाचा-
- Eoin Morgan Retirement : इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इयॉन मॉर्गन घेणार निवृत्ती? संघाला मिळणार नवा कर्णधार
- IRE Vs IND: भुवनेश्वरची सोशल मीडियावर तुफान चर्चा, आयर्लंडविरुद्ध टाकला 208 KMPH वेगानं चेंडू?
- ENG vs IND: रोहित कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मयांक अग्रवालची भारतीय संघात वर्णी, पण कर्णधारपद कोणाकडं?