एक्स्प्लोर

IRE Vs IND: भुवनेश्वरची सोशल मीडियावर तुफान चर्चा, आयर्लंडविरुद्ध टाकला 208 KMPH वेगानं चेंडू?

भारत आणि आयर्लंड यांच्यात रविवारी डबलिनच्या द व्हिलेज स्टेडियमवर (The Village) पहिला टी-20 सामना खेळवण्यात आला. पावसानं व्यत्यय आणलेल्या या सामन्यात भारतानं सात विकेट्स राखून आयर्लंडचा पराभव केला.

India tour of Ireland: भारत आणि आयर्लंड यांच्यात रविवारी डबलिनच्या (Dublin) द व्हिलेज स्टेडियमवर (The Village) पहिला टी-20 सामना खेळवण्यात आला. पावसानं व्यत्यय आणलेल्या या सामन्यात भारतानं सात विकेट्स राखून आयर्लंडचा पराभव केला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडच्या डावातील पहिल्या षटकात जे घडले, ते पाहून खेळाडूंसह प्रेक्षकानाही आश्चर्याचा धक्का बसला. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) गोलंदाजी करत असताना त्याच्या एका चेंडूचा वेग 208 किलोमीटर प्रतितास दाखवण्यात आला. ज्यामुळं सोशल मीडियावर भुवनेश्वर कुमारची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

भुवनेश्वर कुमारनं टाकलेल्या चेंडूचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोच्या एका बाजूस भुवनेश्वर कुमारनं 208 किलोमीटर प्रतितास वेगानं चेंडू टाकल्याचं दाखवलं जातंय. भुवनेश्वर कुमारनं भारताकडून गोलंदाजीची सुरुवात केली. डावातील पहिल्या चेंडूचा वेग 201 किमी प्रतितास दाखवण्यात आला. त्यानंतर चेंडूचा वेग 208 किमी प्रतितास दाखवण्यात आला. परंतु, स्पीडोमीटरच्या बिघाडामुळं हा प्रकार घडल्याची माहिती समोर आलीय. परंतु, नेटकरी याचे स्क्रीन शॉर्ट काढून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.

ट्वीट-

ट्वीट-

ट्वीट- 

भुवनेश्वर कुमारची गोलंदाजी
या सामन्यात भुवनेश्वर कुमारनं शानदार गोलंदाजी करत पहिल्याच षटकात भारताला यश मिळवून दिलं. या सामन्यात भुवनेश्वरनं 3 षटकात 16 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. सुरुवातीला भुवनेश्वरच्या गोलंदाजीसमोर खेळणं आयर्लंडच्या फलंदाजाला कठीण जात होतं. 

भारताची 1-0 नं आघाडी
दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारतानं 1-0 आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना उद्या म्हणजेच 28 जून रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याच्या उद्देशानं भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर, या सामन्यात भारताला पराभूत करून मालिका बरोबरीत आणण्याचा आयर्लंडचा प्रयत्न असेल. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Arjun Tendulkar Wife Saaniya Chandhok : सचिन तेंडुलकरची सूनबाई झाली प्राण्यांची डॉक्टर, सानिया चंडोकने शेअर केले फोटो, नणंदबाई साराची कमेंट तुफान व्हायरल
सचिन तेंडुलकरची सूनबाई झाली प्राण्यांची डॉक्टर, सानिया चंडोकने शेअर केले फोटो, नणंदबाई साराची कमेंट तुफान व्हायरल
IND vs SL 1st Test DAY-5 Live : पाचव्या दिवशी अखेर पहिली विकेट मिळाली! जडेजाने 95 धावांची जोडी फोडली, श्रीलंकेला दिला मोठा धक्का
पाचव्या दिवशी अखेर पहिली विकेट मिळाली! जडेजाने 95 धावांची जोडी फोडली, श्रीलंकेला दिला मोठा धक्का
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Ind vs Sl 1st Test : शांत अन् बुजऱ्या स्वभावाचा अजिंक्य रहाणे रवी शास्त्रींच्या आवाजात बोलू लागला; सगळेच चाट पडले, अख्खा स्टुडिओ पाहतच राहिला, Video
शांत अन् बुजऱ्या स्वभावाचा अजिंक्य रहाणे रवी शास्त्रींच्या आवाजात बोलू लागला; सगळेच चाट पडले, अख्खा स्टुडिओ पाहतच राहिला, Video

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Embed widget