(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Sharma : सलामीवीर 'हिटमॅन' सातव्या क्रमांकावर का उतरला? रोहित शर्माला का आठवले पदार्पणाचे दिवस? जाणून घ्या
India vs West Indies : सलामीवीर असणारा रोहित सातव्या क्रमांकावर उतरल्यामुळे यामागचं नेमकं कारण काय असा प्रश्नही चाहत्यांच्या मनात निर्माण झाला. रोहितनंही मॅचनंतर यामागचं खरं कारण सांगितलं आहे.
Rohit Sharma Reaction : बार्बाडोसमध्ये वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सलामीवीर असणारा रोहित सातव्या क्रमांकावर उतरल्यामुळे यामागचं नेमकं कारण काय असा प्रश्नही चाहत्यांच्या मनात निर्माण झाला. रोहितनंही मॅचनंतर यामागचं खरं कारण सांगितलं आहे.
रोहित सातव्या क्रमांकावर का उतरला?
भारताने 3 वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाने कॅरेबियन संघावर 5 गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची खालच्या फळीतील फलंदाजीसाठी उतरल्याने हा विषय चांगलाच चर्चेत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता आणि टीम इंडियाकडून ईशान किशन आणि शुभमन गिल सलामीला आले.
रोहितला पदार्पणाचे दिवस आठवले
Rohit Sharma said "Batting at 7 reminded me of my debut for India". (Smiles) pic.twitter.com/eYmn7XT8T3
— Johns. (@CricCrazyJohns) July 27, 2023
युवा खेळाडूंना संधी
कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात सलामीऐवजी सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. डावाच्या 23व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने विजयी चौकार मारला. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने याबाबत प्रतिक्रिया देत सांगितलं की, 'मला कधीच वाटले नव्हते की ही खेळपट्टी आहे. संघाला पहिल्यांदा गोलंदाजी करून धावा करण्याची गरज होती. खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंसाठी सर्वकाही होते. आमच्या गोलंदाजांनी त्यांना कमी धावसंख्येपर्यंत मर्यादित ठेवण्याचे चांगलं काम केलं. मी भारताकडून पदार्पण केले तेव्हा मी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत होतो. मला ते दिवस आठवले.
हिटमॅननं सांगितलं खरं कारण?
या सामन्यातून रोहित शर्माने वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला वनडे पदार्पणाची संधी दिली. सामन्यानंतर रोहित म्हणाला, 'एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना वेळ द्यायचा होता. संघ जे काही घेऊन आला आहे, आम्ही जेव्हा शक्य असेल तेव्हा त्या गोष्टींचा प्रयत्न करत राहू. आम्हाला माहित होते की, त्यांना 115 धावांपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी आम्ही या नव्या खेळांडूचा वापर करू शकतो आणि त्यांना संधी देऊ शकतो. मला वाटत नाही की, त्याला अशा जास्त संधी मिळतील. मुकेशने खूप चांगली खेळी केली. तो चेंडू चांगल्या वेगाने स्विंग करू शकतो हे पाहून छान वाटलं. मी त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये फारसे पाहिले नाही. त्यानंतर इशानने फलंदाजी करत चांगली साथ दिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :