एक्स्प्लोर

India vs Sri Lanka : श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतही वर्चस्व गाजवण्यासाठी टीम इंडिया सज्ज, कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

Sri Lanka vs India 1st T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला आजपासून सुरुवात, आज रात्री 8 वाजता खेळणार पहिला सामना

Sri Lanka vs India 1st T20 : वनडे सीरीज आपल्या नावे केल्यानंतर आता शिखर धवनच्या नेतृत्त्वात टीम इंडिया टी20 सीरिजमध्येही आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी मैदानावर उतरणात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या टी20 मालिकेतील पहिला सामना आज रात्री 8 वाजता खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेतील कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येईल. 

इंडियन प्रीमियर लीगमध्ये दमदार खेळी करणाऱ्या खेळाडूंचा टीम इंडियामध्ये समावेश आहे. त्यामुळे आजचा सामना खिशात घालून श्रीलंकेविरोधातील टी20 मालिकेची सुरुवात विजयानं करण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील असणार आहे. शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि हार्दिक पांड्या यांच्यासारखे स्टार खेळाडूंसह आज टीम इंडिया श्रीलंकेविरोधात मैदानावर उतरेल. 

आज वरुण चक्रवर्ती खेळू शकतो पदार्पणाचा सामना 

शिखर धवनच्या नेतृत्त्वात टीम इंडियानं एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकानं खिशात घातली. एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामन्यात पराभवाचा सामना करुनही टीम इंडियाचं पारड जड दिसून आलं. प्रशिक्षक राहुल द्रविड या मालिकेत वरुण चक्रवर्तीचा संघात समावेश करु शकतो. वरुण ऑफ ब्रेक, कॅरम बॉल आणि उजव्या हातानं फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांसाठी लेग ब्रेकही करु शकतो. आयपीएलमध्ये आपलं हेच कसब वापरुन वरुणनं भल्या भल्या फलदांजांची विकेट घेतली होती. 

पृथ्वी शॉ आणि शिखर धवन करणार सुरुवात  

श्रीलंकेविरोधातील पहिल्या टी20 सामन्यात शिखर धवन आणि पृथ्वी शॉ ही जोडी फलंदाजीसाठी मैदानावर उतरेल. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ईशान किशन आणि चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव बॅटिंग करु शकतो. त्यानंतर संजू सॅमसनला संधी मिळू शकते. तसेच पांड्या ब्रदर्स फिनिशर म्हणून भूमिका निभावतील. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर ही जोडी अॅक्शन मोडमध्ये दिसू शकते. 

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, इशान किशन, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल, दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
Mirzapur Season 3 Review :   गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Full PC : 1500 रुपयात काय येणार? लाडकी बहीण योजनेवरुन सरकरला सुनावलं!Vijay Wadettiwar Full PC : सरकारकडून शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी,  विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीकाSanjay Raut on Victory Parade Bus:गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे का? :संजय राऊतRohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
Mirzapur Season 3 Review :   गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Mirzapur 3  Online Leaked :   'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
Pune Crime : पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Embed widget