IND vs SA : संजू सॅमसनची झुंज व्यर्थ, भारताच 9 धावांनी पराभव
IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेनंतर आता आजपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. आज मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे.
LIVE
Background
IND vs SA ODI Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. नुकतीच टी20 मालिका पार पडली. या मालिकेत भारताने अखेरचा टी20 सामना 49 धावांनी गमावल्याने दक्षिण आफ्रिकेला क्लिन स्वीप भारत देऊ शकला नाही. भारताने मालिका 2-1 ने जिंकली असून आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ हा टी20 संघापेक्षा संपूर्णपणे वेगळा आहे. टी-20 विश्वचषक जवळ आला असल्यानं भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेत विश्रांती दिली गेली आहे. संघाचं नेतृत्त्व शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) तर उपकर्णधारपद श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्याकडे दिलं गेलं आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात आयपीएल 2022 गाजवणारे युवा खेळाडू असून कुलदीप यादव, ईशान किशन, श्रेयस अय्यर या सध्या संघाबाहेर असणाऱ्या स्टार खेळाडूंनाही घेण्यात आलं आहे. शिखरनं याआधी वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत संघाचं उत्तम नेतृत्व केलं होतं. टी-20 विश्वचषकात संधी न मिळालेल्या खेळाडूंना या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संधी मिळाल्याचं दिसून येत आहे. तर नेमकी कोणा-कोणाला संधी मिळाली आहे पाहूया...
असा आहे भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, आवेश खान
असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ
जनेमन मालन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 6 ऑक्टोबर 2022 | लखनौ |
दुसरा एकदिवसीय सामना | 9 ऑक्टोबर 2022 | रांची |
तिसरा एकदिवसीय सामना | 11 ऑक्टोबर 2022 | दिल्ली |
हे देखील वाचा-