एक्स्प्लोर

भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात कोण चमकणार ? या पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा

World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी  हायव्होल्टेज सामना होणार आहे.

India vs Pakistan, World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी  हायव्होल्टेज सामना होणार आहे. आशिया चषकानंतर भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने सामने येत आहेत. आशिया चषकात अखेरच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता. शनिवारी होणाऱ्या सामन्यात काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जसप्रीत बुमराहच्या कमबॅकमुळे गोलंदाजीला धार आली आहे. त्याशिवाय केएल राहुलमुळे मधल्या फळीची ताकदही वाढली. शनिवारी होणारा हायहोल्टेज सामना रंगतदार होणार, यात शंकाच नाही.  

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आयसीसी सामने वगळता इतर सामने होत नाही. त्यामुळे दोघांमधील लढत पाहण्यासाठी चाहत्यांचा उत्साह वाढलेला असतो. शनिवारी होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्यात कोणता खेळाडू चांगली कामगिरी करतो, याकडे सर्वांची नजर असेलच.. पण पाच खेळाडूंच्या कामगिरीमुळे सामन्याचा निकाल बदलू शकतो. या आघाडीच्या पाच खेळाडूबद्दल जाणून घेऊयात... 

1 – विराट कोहली

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहलीची सर्वाधिक चर्चा होते. विराट कोहली याने पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. आशिया चषकात विराट कोहलीने पाकिस्तानविरोधात शतक ठोकले होते. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या सामन्यातही विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची आपेक्षा असेल. विराट कोहली सध्या भन्नाट फॉर्मात आहे. विश्वचषकातील पहिल्या दोन्ही सामन्यात त्याने अर्धशतके ठोकली आहेत. पाकिस्तानविरोधात विराट कोहलीने 50 पेक्षा जास्त सरासरीने धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहली भारतासाठी मॅच विनिंग खेळी करु शकतो. त्यामुळेच महामुकाबल्यात विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा आहेत. 

2 – बाबर आजम 

विश्वचषकाच्या पहिल्या दोन्ही सामन्यात बाबर आझम याला मोठी खेळी करता आली नाही. श्रीलंकाविरोधात 10 तर नेदरलँडच्या विरोधात 5 धावा काढून बाद झाला होता. त्यामुळे बाबर आझम याच्यावर टीका होत आहे. भारताविरोधात बाबर आझम मोठी खेळी करण्याची शक्यता आहे.  वनडेमध्ये बाबरला भारताविरोधात एकही अर्धशतक ठोकता आलेले नाही. आता शनिवारी होणाऱ्या सामन्यात बाबर कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात.  

3 – रोहित शर्मा

भारताचा कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध भारतासाठी सक्रिय असणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. रोहित शर्माने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्धच्या 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये 51.42 च्या सरासरीने 720 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 6 अर्धशतके आणि 2 शतके झळकली आहेत. हायहोल्टेज सामन्यात कर्णधाराच्या कागिरीकडे लक्ष असेल. अफगाणिस्तानविरोधात रोहित शर्माने शतकी नजारा पेश केला होता. शनिवारीही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

4 – शाहिन आफ्रिदी 

पाकिस्तानच्या गोलंदाजीचे नेतृत्व करणारा शाहिन आफ्रिदी भारतीय फलंदाजांसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे बोलले जात आहे. शाहिनचा सध्याचा फॉर्मही चांगलाच दिसत आहे. शनिवारी मोक्याच्या सामन्यात शाहिनच्या गोलंदाजीवर पाकिस्तानचा विजय अवलंबून असेल. भारताचे फलंदाज डावखुऱ्या गोलंदाजाविरोधात फसतात, हे अनेकदा पाहिले जाते. त्यामुळेच या सामन्यातही शाहीनच्या कामगिरीकडे लक्ष असेल. 

5 – जसप्रीत बुमराह

बूम बूम बुमराहने कमबॅक नंतर भेदक मारा केला आहे. विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यात त्याने 6 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय धावाही रोखल्या आहेत.  आतापर्यंत एकदिवसीय कारकिर्दीत बुमराहने पाकिस्तानविरुद्ध 4 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराह सध्या भन्नाट फॉर्मात आहे. पाकिस्तानची आघाडीची फळी उद्धवस्त करण्यात बुमराह यशस्वी ठरतो का? हे शनिवारीच समजेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Bangar On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, संतोष बांगर काय म्हणाले?Devendra Fadnavis Maharashtra CM : फडणवीसांची नेतेपदी निवड,सभागृहात काय काय घडलं? UNCUT VIDEODevendra Fadnavis Speech : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUTDevendra Fadnavis CM | फडणवीस भाषणाला उठताच महाराष्ट्राचा लाडका भाऊच्या घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
Embed widget