IND vs PAK : मौका! मौका! भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने, आशिया कपमधील लढतीची तारीख ठरली!
India vs Pakistan : यंदाच्या आशिया कपची सुरुवात 27 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे. यंदा भारत-पाकिस्तान एकाच पूलमध्ये आहेत.
IND vs PAK, Asia Cup : जागतिक क्रिकेटमधील सर्वात कट्टर प्रतिस्पर्धाी म्हणजे भारत-पाकिस्तान (India vs Pakistan). दोन्ही देशांतील संबध फारसे ठिक नसल्याने दोघेही एकमेंकाचा दौरा करत नाहीत. त्यामुळे जागतिक स्पर्धांमध्येच दोघेही आमने-सामने येत असून आता आगामी आशिया कपमध्ये 28 ऑगस्ट रोजी भारत-पाकिस्तान हा बहुप्रतिक्षित सामना रंगणार आहे. बीसीसीआयने नुकतचं आशिया कप 2022 चं वेळापत्रक जाहीर केलं, ज्यातून ही माहिती समोर आली आहे.
27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर आशिया चषक
आशिया खंडासाठीची सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आशिया कप 2022 (Asia Cup 2022) लवकरच पार पडणार अशी माहिती समोर येत होती.पण आता नुकतंच या स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्वीट करत ही माहिती दिली असून बीसीसीआयने देखील जय याचं ट्वीट पोस्ट केलं आहे. 27 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार असून 11 सप्टेंबर रोजी अंतिम सामना पार पडणार आहे. यंदा आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे पाच देश एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. नेमकं आशिया चषकाचं वेळापत्रक कसं आहे पाहूया..
सामना | दिवस | दिनांक | संघ | ग्रुप | ठिकाण |
1 | शनिवार | 27 ऑगस्ट | अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका | बी | दुबई |
2 | रविवार | 28 ऑगस्ट | भारत विरुद्ध पाकिस्तान | ए | दुबई |
3 | मंगळवार | 30 ऑगस्ट | बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान | बी | शारजाह |
4 | बुधवार | 31 ऑगस्ट | भारत विरुद्ध पात्र संघ | ए | दुबई |
5 | गुरुवार | 1 सप्टेंबर | श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश | बी | दुबई |
6 | शुक्रवार | 2 सप्टेंबर | पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ | ए | शारजाह |
7 | शनिवार | 3 सप्टेंबर | ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 | सुपर 4 | शारजाह |
8 | रविवार | 4 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
9 | मंगळवार | 6 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 | सुपर 4 | दुबई |
10 | बुधवार | 7 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
11 | गुरुवार | 8 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
12 | शुक्रवार | 9 सप्टेंबर | ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
13 | रविवार | 11 सप्टेंबर | सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
हे देखील वाचा-