India vs England Test, 2021: इंग्लंडविरुद्ध विराट धोनीचा विक्रम मोडण्याची शक्यता
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पहिली आणि दुसरी कसोटी चेन्नई येथे खेळली जाणार आहे. चार कसोटी सामन्यांची ही मालिका असणार आहे.
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. विराट कोहलीचे चाहतेदेखील एका विशेष कारणास्तव या मालिकेची वाट पाहत आहेत. या मालिकेत विराट भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा मोठा विक्रम मोडू शकतो. घरच्या मैदानावर कसोटी मालिका जिंकण्याच्या बाबतीत कर्णधार म्हणून विराट कोहली आणि धोनी बरोबरीत आहेत. या दोघांनी आतापर्यंत 6-6 कसोटी मालिकेत भारताला विजय मिळवून दिला आहे.
टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यास विराट कोणत्याही भारतीय कर्णधारापेक्षा घरच्या मैदानावरील सर्वात कसोटी मालिका जिंकणारा कर्णधार होईल. इतकेच नाही तर विराट भारतात सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा कर्णधार देखील होऊ शकतो. त्याने टीम इंडियाकडून आतापर्यंत कर्णधार म्हणून 20 कसोटी सामने जिंकले आहेत. तर धोनीने भारतीय कर्णधार म्हणून 21 सामने जिंकले आहेत.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत 'हे' विक्रम होण्याची शक्यता, विराटवर असणार लक्ष
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पहिली आणि दुसरी कसोटी चेन्नई येथे खेळली जाणार आहे. चार कसोटी सामन्यांची ही मालिका असणार आहे. सध्या टीम इंडियाचा या मालिकेसाठी जोरदार सराव सुरू केला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात, पाहा संपूर्ण टाईमटेबल
कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात
- पहिला सामना: 5 फेब्रवारी ते 9 फेब्रुवारी (चेन्नई)
- दुसरा सामना: 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी (चेन्नई)
- तिसरा सामना: 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी (अहमदाबाद)
- चौथा सामना: 4 मार्च ते 8 मार्च (अहमदाबाद)
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. यात विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, रिद्धिमान साहा, कुलदीप यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे.
विराट पुन्हा कर्णधारपदी येताच अजिंक्य रहाणेची लक्षवेधी प्रतिक्रिया
संबंधित बातम्या
- Ind vs Eng | भारतात आल्यानंतर इंग्लंडचा संघ क्वॉरंटाईन; प्रॅक्टिससाठी केवळ 3 दिवस
- IND Vs ENG | इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यांत 'या' भारतीय गोलंदाजाला मिळू शकते संधी
- IND Vs ENG: इंग्लंडचे फिरकीपटू भारतीय खेळपट्टीवर चालणार नाहीत, माजी क्रिकेटरचा दावा
- IND vs ENG: अहमदाबादमध्ये इंग्लंडकडून भारत कधीच हरला नाही, आकडेवारी जाणून घ्या
- IND vs ENG | 107 वर्षांनी इंग्लंडनं परदेशात जिंकल्या सलग 5 कसोटी मालिका; टीम इंडिया विजयी घौडदौड रोखणार?