India vs England, 5th Test at Dharamsala : भारत डावाने विजयाच्या दिशेने, दुसऱ्या डावात इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत
आज तिसऱ्या दिवशी भारताने 8 बाद 473 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. भारताचे शेवटचे दोन फलंदाज अवघ्या 4 धावा करुन माघारी परतले. त्यामुळे भारताचा पहिला डाव सर्वबाद 477 धावांवर आटोपला.
India vs England, 5th Test at Dharamsala : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत टीम इंडिया (Team India) डावाने विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. दुसऱ्या डावाच्या पहिल्याच सत्रात इंग्लंडचे पाच फलंदाज तंबूत परतले. भारताने पहिल्या डावात इंग्लंडवर तब्बल 259 धावांनी आघाडी घेतली. त्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा निम्मा संघ 103 धावांवर माघारी परतला. त्यामुळे इंग्लंड अजूनही दीडशे पेक्षा जास्त धावांनी पिछाडीवर आहे.
4 wickets for Ravi Ashwin in the session.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 9, 2024
England on the backfoot, an innings loss loading in Dharamshala. pic.twitter.com/j9mfls5qlW
दरम्यान, आज तिसऱ्या दिवशी भारताने 8 बाद 473 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. भारताचे शेवटचे दोन फलंदाज अवघ्या 4 धावा करुन माघारी परतले. त्यामुळे भारताचा पहिला डाव सर्वबाद 477 धावांवर आटोपला. तोपर्यंत भारताने इंग्लंडवर 259 धावांची आघाडी घेतली होती. यानंतर इंग्लंडचे फलंदाज दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरले. पण आर अश्विनने इंग्लंडच्या फलंदाजांची पळता भुई थोडी केली. अश्विनने इंग्लंडच्या चार फलंदाजांना तंबूत धाडलं.
It's Lunch on Day 3 of Dharamsala Test!
— BCCI (@BCCI) March 9, 2024
A brilliant First Session with the ball for #TeamIndia! 👌 👌
Stay Tuned for Second Session! ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/jnMticF6fc#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/mo96MWtCzO
सलामीवीर क्रॉलीला अश्विनने भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर लगेचच डकेतला माघारी धाडत, अश्विनने इंग्लंडला दुसरा धक्का दिला. ओली पोपने 19 धावा करुन ज्यो रुटच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अश्विनने त्याचा अडथळा दूर केला.
यानंतर मग कुलदीप यादवने जॉनी बेअस्ट्रो आणि अश्विनने कर्णधार बेन स्टोकचा काटा काढून इंग्लंडचा निम्मा संघ 103 धावांत माघारी धाडला.
इतर महत्वाच्या बातम्या