IND vs ENG 5th Test : अखेरचा कसोटी सामना कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या सर्वकाही
IND vs ENG 5th Test : बॅझबॉल आल्यानंतर इंग्लंड सलग सात कसोटी मालिकेत अजेय होता, पण भारताच्या भूमीत त्यांना पराभव पाहावा लागलाय.
IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका (IND vs ENG) आता अखेरच्या टप्प्यात आहे. भारतीय संघाने (Team India) चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. आता अखेरचा कसोटी सामना पुढील महिन्यात सुरु होणार आहे. त्याआधी इंग्लंडचा संघ ब्रेकवर गेलाय. लागोपाठ तीन सामन्यात पराभवाचा सामना करणारा इंग्लंडचा संघ नव्या दमाने मैदानात उतरेल. अखेरचा सामना जिंकून इंग्लंडचा संघ शेवट गोड करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल, याच शंकाच नाही. इंग्लंडच्या अतिआक्रमक बॅझबॉल भारतीय भूमीवर सपशेल अपयशी ठरला. भारताचा हैदराबाद कसोटीमध्ये पराभव करत इंग्लंडनं दणक्यात सुरुवात केली, पण त्यानंतर भारताने पलटवार केला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सलग तीन सामन्यात विजय मिळवला. विशाखापट्टणम कसोटीत भारताने 106 धावांनी विजय मिळवला. राजकोट कसोटी सामन्यात 434 धावांनी विजय मिळवला, त्यानंतर रांची कसोटीत पाच विकेटने मात केली. आता अखेरचा सामना जिंकून शेवट गोड कऱण्यासाठी साहेब मैदानात उतरली. तर भारतीय संघही विजयाच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. दरम्यान, बॅझबॉल आल्यानंतर इंग्लंड सलग सात कसोटी मालिकेत अजेय होता, पण भारताच्या भूमीत त्यांना पराभव पाहावा लागलाय.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा कसोटी सामना कधी आहे ?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा पाचवा कसोटी सामना सात मार्च ते 11 मार्च यादरम्यान होणार आहे.
पाचवा कसोटी सामना कुठे होणार ?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना हिमाचल प्रदेशच्या धरमशालामध्ये एचपीसीए स्टेडियमवर पार पडणार आहे.
पाचवा कसोटी सामना किती वाजता सुरु होणार ?
मालिकेतील अखेरचा कसोटी सामना सकाळी 9.30 वाजता सुरु होईल. त्याआधी अर्धा तास नाणेफेक होईल.
कुठे पाहाल अखेरचा सामना ?
जिओ अॅपवर मोफत सामना पाहता येईल. टिव्हीवर स्पोर्ट्स 18 या चॅनलवर सामना पाहता येईल. त्याशिवाय सामन्यासंदर्भातील सर्व अपडेट एबीपी माझाच्या वेबसाईटवर वाचायला मिळतील.
तीन टप्प्यात होईल प्रत्येक दिवसाचा खेळ -
पाचव्या कसोटी मालिकेतील दिवसाचं पहिलं सत्र दोन तासांचं असेल. म्हणजे, 11.30 वाजेपर्यंत पहिल्या सत्रात सामना होईल. त्यानंतर 40 मिनिटांचा लंच ब्रेक असेल. दुपारी 11.10 वाजता पुन्हा सामन्याला सुरुवात होईल. दुसरं सत्रही दोन तासांचं असेल. भारतीय वेळानुसार, दुपारी 2.10 वाजता चायपाण्याचा ब्रेक असेल. 20 मिनिटांच्या या ब्रेकनंतर अखेरच्या सत्राला सुरुवात होईल. 2.30 मिनिटांनी अखेरच्या सत्राला सुरुवात होईल. 4.30 वाजता दिवसाचा खेळ संपेल.
आणखी वाचा :
- धोनीचा हुकुमी एक्का पुन्हा चमकला, मराठमोळ्या खेळाडूने 11 व्या नंबरवर येऊन शतक ठोकलं!
- IND vs ENG: पाकिस्तानात जन्म, भारतामध्ये गाडले, जॉन राईटनं सांगितली बॅझबॉलच्या अंताची कहाणी!
- शाळेच्या अभ्यासक्रमात रोहित शर्माचा धडा, विश्वास बसत नसेल तर पाहा हे फोटो
- कसोटी खेळणारे होणार मालामाल, BCCI पगारात करणार वाढ, बोनसही देणार!
- IND vs ENG : शुभमन गिलचा पराक्रम, विराट,गंभीरला न जमलेला रेकॉर्ड केला, रोहित आसपासही नाही
- हनुमा विहारीचं कर्णधारपद गेले, नेत्याच्या मुलासोबतचा पंगा पडला महागात!
- ईशान, अय्यरसाठी टीम इंडियाची दारं बंद? रोहित शर्माच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण!
- साहेबांच्या 'बॅझबॉल'चं बँड वाजलं, इंग्लंडनं पहिल्यांदाच गमावली मालिका, रोहितसेनाचा पराक्रम!
- शामीच्या पायाचं झालं ऑपरेशन, IPL आणि T20 वर्ल्ड कपला मुकणार?
- जुरेल आला, उभा राहिला अन् लढला, मग आता आनंद महिंद्रा थार कधी देणार? नेटकऱ्यांचा थेट प्रश्न
- मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी दिलासा, कर्णधार मैदानावर परतला, चार महिन्यानंतर केली गोलंदाजी!