एक्स्प्लोर

Hanuma Vihari Controversy : नेत्याच्या मुलासोबत पंगा, कर्णधारपदावरुन काढलं, हनुमा विहारी वादातील महत्वाचे 10 मुद्दे

Hanuma Vihari Andhra Pradesh : संघातील 17 व्या खेळाडूवर भडकल्यामुळे मला कर्णधारपदावरुन काढलं. त्या मुलाचे वडील एक राजकीय नेते आहेत, त्यांच्या दबावामुळेच आंध्र प्रदेश क्रिकेट बोर्डानं मला कर्णधारपदावरुन हटवलं, असा आरोप विहारीनं केलाय.

Hanuma Vihari Andhra Pradesh : रणजी ट्रॉफीमध्ये सोमवारी आंध्र प्रदेशला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह आंध्र प्रदेशचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.  त्यानंतर आंध्र प्रदेशच्या क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली. दिग्गज क्रिकेटर हनुमा विहारी (Hanuma Vihari) याला कर्णधारपदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर हनुमा विहारीनं (Hanuma Vihari) आंध्र प्रदेश क्रिकेट बोर्डावर (andhra pradesh cricket association) गंभीर आरोप केले. रणजी हंगामातील पहिल्या सामन्यानंतर मी राजीनामा दिला नव्हता, तर कर्णधारपदावरुन काढलं होतं. हनुमा विहारीनं संघातील सहकाऱ्यामुळे मला राजीनामा द्यावा लागला, असा आरोप केला. संघातील 17 व्या खेळाडूवर भडकल्यामुळे मला कर्णधारपदावरुन काढलं. त्या मुलाचे वडील एक राजकीय नेते आहेत, त्यांच्या दबावामुळेच आंध्र प्रदेश क्रिकेट बोर्डानं मला कर्णधारपदावरुन हटवलं, असा आरोप विहारीनं केलाय. या प्रकरणातील महत्वाचे 10 मुद्दे समजून घेऊयात... 

  • रणजी ट्रॉफीमध्ये फक्त एका सामन्यानंतरच हनुमा विहारी याला कर्णधारपदावरुन पायउतार केले. 
  • यंदाचा रणजी स्पर्धेचा हंगाम संपल्यानंतर आंध्र प्रदेश क्रिकेट सोडण्याची घोषणा हनुमा विहारीनं केली. 
  • राजकीय दबावामुळे कर्णधारपद गेल्याचा आरोप हनुमा विहारीनं केला आहे. 
  • पश्चिम बंगालविरोधातील सामन्याआधी संघातील 17 व्या क्रमांकाच्या खेळाडूला फटकारलं होतं. त्या मुलाच्या वडिलांनी (जे राजकीय नेते आहेत ) मला कर्णधारपदावरुन काढलं. 
  • आंध्र क्रिकेट बोर्डावरही हनुमा विहारीनं आरोप केलेत. साथ देण्याऐवजी अनादर केला, असा आरोप केलाय.  
  • परुधवी राज यानं हनुमा विहारीच्या आरोपाचं खंडन केलेय. त्यानं इन्स्टाग्राम पोस्टद्वारे हनुमा विहारीवर आरोप केलेत. हनुमा विहारीनं आपमानजक भाषेचा वापर केल्याचा आरोप त्यानं केलाय.  
  • हनुमा विहारीनं केलेली आपमानजक भाषा असाह्य आहे. हनुमा विहारी आता  सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. 
  • हनुमा विहारीने त्यात आणखी एक नवा अध्याय जोडला. आंध्र प्रदेशच्या खेळाडूंच्या सहीचा फोटो हनुमा विहारीने पोस्ट केला. त्यामध्ये सर्व खेळाडूंचा त्याला सपोर्ट असल्याचा दावा केलाय. 
  • हनुमा विहारीला कर्णधार कायम ठेवण्यासाठी सर्व खेळाडूंनी सह्या केल्याचं दिसतेय. त्याशिवाय या सर्व प्रकरणात हनुमा विहारीची काही चूक नसल्याचाही पत्रात उल्लेख आहे.
  • हनुमा विहारीनं सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत, त्यामध्ये 15 खेळाडूंचा त्याला सपोर्ट असल्याचं दिसतेय. 
  • हनुमा विहारीच्या राजीनाम्यानंतर आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. टीडीपे नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 

आणखी वाचा :

हनुमा विहारीचं कर्णधारपद गेले, नेत्याच्या मुलासोबतचा पंगा पडला महागात!

ईशान, अय्यरसाठी टीम इंडियाची दारं बंद? रोहित शर्माच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण!

साहेबांच्या 'बॅझबॉल'चं बँड वाजलं, इंग्लंडनं पहिल्यांदाच गमावली मालिका, रोहितसेनाचा पराक्रम!

Mohammed Shami Surgery : शामीच्या पायाचं झालं ऑपरेशन, IPL आणि T20 वर्ल्ड कपला मुकणार? 

IND vs ENG : जुरेल आला, उभा राहिला अन् लढला, मग आता आनंद महिंद्रा थार कधी देणार? नेटकऱ्यांचा थेट प्रश्न

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी दिलासा, कर्णधार मैदानावर परतला, चार महिन्यानंतर केली गोलंदाजी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Embed widget