हनुमा विहारीचं कर्णधारपद गेले, नेत्याच्या मुलासोबतचा पंगा पडला महागात!
Andhra Pradesh : रणजी चषकात (ranji trophy 2024) हनुमा विहारी आंध्र प्रदेश संघाचं नेतृत्व करत होता. पण त्याला अचानक कर्णधारपदावरुन पायउतार व्हावं लागलं.
Hanuma Vihari Andhra Pradesh : क्रिकेटर हनुमा विहारीला आंध्र प्रदेश संघाचं (Andhra Pradesh) कर्णधारपद गमावावं लागलेय. त्याला कारण, संघातील 17 व्या क्रमांकाच्या खेळाडूला फटकारणं महागात पडलेय. हनुमा विहारीनं (Hanuma Vihari) इन्स्टाग्राम पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. रणजी चषकात (ranji trophy 2024) हनुमा विहारी आंध्र प्रदेश संघाचं नेतृत्व करत होता. पण त्याला अचानक कर्णधारपदावरुन पायउतार व्हावं लागलं. हनुमा विहारी यानं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपलं दु:ख व्यक्त केलेय. हनुमा विहारीनं ज्या खेळाडूचा उल्लेख केलाय, त्यानं आपल्यामुळं विहारीचं कर्णधारपद गेल्याचं आरोप फेटाळला.
हनुमा विहारीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, "आम्ही चांगली लढत दिली. पण पुन्हा एकदा आंध्र प्रदेश संघाला क्वार्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पश्चिम बंगालविरोधात पहिल्या सामन्यात मी संघाचा कर्णधार होतो. पण त्यावेळी मी 17 व्या क्रमांकाच्या खेळाडूला झापलं. त्या खेळाडूनं वडिलांकडे तक्रार केली. त्याचे वडील राजकीय नेता होता. त्यामुळे माझ्याकडे बोर्डानं राजीनामा मागितला."
हनुमा विहारीचे गंभीर आरोप -
त्या खेळाडूविरुद्ध माझं वैयक्तिक कोणतेही भांडण नव्हतं. मी त्याला काही तसं बोललोही नाही. संघ माझ्यासाठी पहिला आहे. पण बोर्डासाठी तो खेळाडू महत्वाचा आहे. एक खेळाडू संघापेक्षा मोठा झालाय. सात वर्ष मी या संघासाठी सर्वकाही दिलं. यादरम्यान मी टीम इंडियासाठी सात कसोटी सामनेही खेळलो. याआधीह संघासोबत काही गोष्टी वाईट झाल्या आहेत पण या सर्व गोष्टी असूनही मी संघाशी जोडलेला आहे. आतापर्यंत मी काही बोललो नव्हतो. पण हे जे काही झालं ते खूप अति झालं. आम्ही संघ म्हणून चांगली कामगिरी करत आहोत, पण बोर्डाला हे पाहावत नाही, असे हनुमा विहारीने आरोप केले आहेत.
Hanuma Vihari's Instagram post.
— Johns. (@CricCrazyJohns) February 26, 2024
- He was asked to resign by the association as the captain during the first match for shouting at a player whose father is a politician.
It's sad to see what is happening in Indian domestic cricket. pic.twitter.com/ZgqHK5VjQB
तो खेळाडू आला समोर, दिलं स्पष्टीकरण -
हनुमा विहारीनं आरोप केलेला खेळाडू प्रसारमाध्यमाच्या समोर आला. त्याचं नाव परुधवी राज असे आहे. त्यानं सोशल मीडियावर म्हटलेय की, हनुमा विहारीनं केलेले आरोप चुकीचे आहोत. माझ्या अथवा इतर कुणापेक्षाही क्रिकेट मोठं आहे. त्या दिवशी नेमकं काय झालं, हे संघातील सर्वांनाच माहिती आहे. हनुमा विहारी आता सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानं आपत्तीजनक शब्दात मला शिविगाळ केली होती.
आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ -
हनुमा विहारीच्या पोस्टनंतर आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. टीडीपीच्या नेत्यानं आंध्र प्रदेश क्रिकेट बोर्ड आणि सत्ताधारी पक्षावर आरोप केले आहेत. त्याशिवाय सोशल मीडियावरही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काहींनी हनुमा विहारी ऑस्ट्रेलियामध्ये दुखापत असतानाही लढल्याचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
#WATCH | On Indian batter Hanuma Vihari accusing Andhra Cricket Association (ACA) of mistreatment, TDP leader Varla Ramaiah says, "It is very ridiculous to know that the government & ruling party of Jagan Mohan Reddy is interfering at every stage & every field and destroying the… pic.twitter.com/yEyio1Dhsk
— ANI (@ANI) February 27, 2024
Unfortunate to see #HanumaVihari who represented India at the highest level getting snubbed by internal politics of Andra CA
— V✌️ (@bengalurubouy2) February 26, 2024
Here is a glimpse of the guy batting left handed for his state team when his right hand was fractured last year during a Matchpic.twitter.com/3Tfy39d5A3
आणखी वाचा :
ईशान, अय्यरसाठी टीम इंडियाची दारं बंद? रोहित शर्माच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण!
साहेबांच्या 'बॅझबॉल'चं बँड वाजलं, इंग्लंडनं पहिल्यांदाच गमावली मालिका, रोहितसेनाचा पराक्रम!
Mohammed Shami Surgery : शामीच्या पायाचं झालं ऑपरेशन, IPL आणि T20 वर्ल्ड कपला मुकणार?
मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी दिलासा, कर्णधार मैदानावर परतला, चार महिन्यानंतर केली गोलंदाजी!