India vs Australia 1st T20 Preview | आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी20 मालिका; वनडेमधील पराभवाचा वचपा काढणार?
India vs Australia T20 Match Preview | भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघादरम्यान कॅनबेरा येथे आज दुपारी 1:40 वाजता सामना होणार आहे. एकदिवसीय सामन्यातील दारुण पराभवाचा वचपा काढण्याचं विराट सेनेसमोर आव्हान असेल.
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील आज पहिला सामना कॅनबेरा येथे खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघासमोर टी20 मालिकेत विजय मिळवण्याचं आव्हान असेल. ऑस्ट्रेलियाचा संघही टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल.
भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. एकदिवसीय मालिकेत विजय प्राप्त केलेला ऑस्ट्रेलिया संघ टी20 सामन्याच्या माध्यमातून विजयाची मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
ऑस्ट्रेलियाचा तडाखेबंद फलंदाज डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याचा परिणाम ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवर होण्याची शक्यता आहे.
मॅथ्यू वेड सलामीला येण्याची शक्यता ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक मॅथ्यू वेड आज सलामीला खेळण्याची शक्यता आहे. आजच्या टी20 सामन्यात डार्सी शॉर्टच्या जागी मॅथ्यू वेडला ऑस्ट्रेलिया संघ सलामीला उतरवण्याची शक्यता आहे. डार्सी शॉर्टला डेव्हिड वॉर्नरच्या जागी संघात सामील करण्यात येणार आहे.
भारतीय फलंदाजीचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रलिया संघ दोन स्पिन गोलंदाजांना खेळवण्याची शक्यता आहे. असं झालं तर पुन्हा एकदा अॅश्टन एगर आणि अॅडन झेम्पा यांची जोडी कमाल दाखऊ शकते.
भारतीय संघातर्फे केएल राहुल आणि शिखर धवन सलामीला उतरु शकतात. मयंक अग्रवालचाही संघात समावेश असल्याने विराट कोहलीसाठी प्लेइंग इलेव्हनची निवड करणं अवघड ठरु शकतं.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या माध्यमातून टी नटराजनने आंतरराष्ट्रीय सामन्यात आपलं पदार्पण केलंय. तो आता आपला पहिला टी20 सामना खेळण्याची शक्यता आहे. त्याव्यतिरिक्त संघात मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. सोबत रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांचीही स्पीन गोलंदाजी कमाल दाखवण्याची शक्यता आहे.
आजच्या सामन्यात 'या' विक्रमांची शक्यता आजच्या सामन्यात 16 धावा केल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियाविरोधात 600 धावा पूर्ण होतील. असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरेल
रविंद्र जडेजाने भारतातर्फे आतापर्यंत 49 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आजच्या सामन्यानंतर त्याचे 50 टी20 सामने पूर्ण होतील. तसेच रविंद्र जडेजाने जर आजच्या सामन्यात तीन बळी घेतले तर तो ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक बळी घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरेल. शिखर धवन (266) ऑस्ट्रेलियाविरोधात धावा करण्याच्या बाबतीत युवराज सिंग (283) ला मागे टाकू शकतो.
दोन्ही संघांचा संभावित प्लेइंग इलेवन
ऑस्ट्रेलिया-अॅरोन फिंच (कर्णधार), मैथ्यू वेड, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस/ मोइजेज हेनरिक्स, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), अॅश्टन एगर, अॅडम झेम्पा, मिचेल स्टार्क, जोश हेजलवुज आणि एजे टाय. भारत- विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), शिखर धवन, मयंक अग्रवाल/मनीष पांडे, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव/वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि टी नटराजन, दीपक चहर.
महत्वाच्या बातम्या:
- IND vs AUS | टी20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; युवा खेळाडूंची वर्णी लागणार?
- IND vs AUS | वडील मजूर, आईचं रस्त्यालगत नाश्त्याचं दुकान; 'यॉर्कर किंग' नटराजनच्या संघर्षाची कहाणी
- Ind vs Aus: तिसर्या वनडे सामन्यात भारताकडून ऑस्ट्रेलियाचा 13 धावांनी पराभव, 'हे' खेळाडू विजयाचे शिल्पकार
- Virat Kohli : विराटनं मोडला सचिनचा विक्रम, बनला सर्वात वेगवान 12 हजार धावा करणारा फलंदाज