IND VS AUS: 'हिटमॅन' येताच टीम इंडियाकडून खास स्वागत, पाहा व्हिडीओ
IND VS AUS : बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन रोहित शर्मा संघात दाखल झाल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
IND VS AUS : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा हिट-मॅन रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांसाठी मेलबर्नमध्ये टीम इंडियामध्ये सामील झाला आहे. रोहित संघात दाखल होताच सहकारी खेळाडूंनी टाळ्या वाजवून 'हिटमन'चं स्वागत केलं. बंगळुरुमधील नॅशनल क्रिकेट एकॅडमी (एनसीए) येथे फिटनेस टेस्ट पास केल्यावर रोहित ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रोहित शर्मा संघात दाखल झाल्याचा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
Look who's joined the squad in Melbourne ????
A warm welcome for @ImRo45 as he joins the team ????#TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/uw49uPkDvR — BCCI (@BCCI) December 30, 2020
व्हिडीओमध्ये भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री रोहितला क्वारंटाईन कालावधीत कसा होता याचा विचारताना दिसत आहे. संघात सामील झाल्यानंतर रोहितने भारतीय संघातील सर्व खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना भेटून मिठी मारली. रोहितची पुनरागमन भारतीय संघ अधिक मजबूत होणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सुरू होईल. पण या सामन्यात रोहित शर्मा खेळेल की नाही यावर अजूनही संभ्रम कायम आहे. क्वारंटाईन कालावधीनंतर रोहितला आता फिटनेस टेस्ट पास करावी लागणार आहे. मयांक अग्रवालच्या खराब फॉर्म पाहता रोहित शर्माचा तिसर्या कसोटीत भारतीय संघात समावेश होऊ शकतो. रोहितने अद्याप ऑस्ट्रेलियामध्ये सराव केलेला नाही.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली त्यावेळी रोहितचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणाऱ्या टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला नव्हता. परंतु, त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये खेळण्यासाठी रोहितचा संघात समावेश करण्यात आला. असं सांगण्यात येत आहे की, विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळणार नाही, त्यामुळे विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माची हजेरी टीम इंडियासाठी दिलासा ठरु शकते.
संबंधित बातम्या
IND Vs AUS | विराटच्या अनुपस्थितीत रहाणेचं कुशल नेतृत्त्व, मेलबर्नहून गौरव जौशीचा खास रिपोर्ट