India Tour Of Zimbabwe : टीम इंडिया झिम्बाब्वेसाठी रवाना; बीसीसीआयने शेअर केले फोटो
ZIM vs IND: भारत झिम्बाब्वे विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला असून नुकतेच भारतीय खेळाडू दौऱ्यासाठी (India tour of Zimbabwe) झिम्बाब्वेला रवाना झाले आहेत.
![India Tour Of Zimbabwe : टीम इंडिया झिम्बाब्वेसाठी रवाना; बीसीसीआयने शेअर केले फोटो India Tour Of Zimbabwe team India off to Zimbabwe BCCI shares Photos India Tour Of Zimbabwe : टीम इंडिया झिम्बाब्वेसाठी रवाना; बीसीसीआयने शेअर केले फोटो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/13/a8798b4401a758511acad642690de4ac1660392728538323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India Tour Of Zimbabwe : वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 3-0 ने तर पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 ने जिंकल्यानंतर भारत आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी (India Tour Of Zimbabwe) सज्ज झाला आहे. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान भारत आणि झिम्बाब्वे (Zimbabwe Vs India) यांच्यातील पहिल्या सामन्याला काही दिवस शिल्लक असल्याने भारतीय खेळाडू झिम्बाब्वेला रवाना झाले आहेत. बीसीसीआयनं याबाबतचे फोटो देखील शेअर केले आहेत.
Zimbabwe 🇿🇼 bound! ✈️#TeamIndia | #ZIMvIND pic.twitter.com/GKsofzEvRe
— BCCI (@BCCI) August 12, 2022
झिबाब्वेविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 20 ऑगस्ट आणि तिसरा सामना 22 ऑगस्टला खेळवला जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने हरारे येथे पार पडतील. भारत आणि झिम्बाब्वे मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता सुरू होतील.
भारत- झिम्बाव्वे एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 18 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
दुसरा एकदिवसीय सामना | 20 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
तिसरा एकदिवसीय सामना | 22 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
केएल राहुल संभाळणार भारतीय संघाची धुरा़
झिम्बाब्वे दौऱ्यात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्या यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. यामुळं या दौऱ्यात केएल राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसत आहे. तर, शिखर धवनकडं उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघानं 2016 मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केलाय.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)