(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Tour of South Africa 2021: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ओमायक्रॉनचं सावट, बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
India Tour of South Africa 2021: दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंट ओमायक्रॉननं संपूर्ण जगाला चिंतेत टाकलंय.
India Tour of South Africa 2021: दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंट ओमायक्रॉननं (Omicron) संपूर्ण जगाला चिंतेत टाकलंय. दरम्यान, ओमायक्रॉननं व्हेरिएंटचा फकटा भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यालाही बसण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
भारतीय संघ 9 डिसेंबर रोजी चार्टर्ड विमानातून दक्षिण आफ्रिकेला जाणार होता. मात्र, ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं हा दौरा पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जातेय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान निवड समितीची दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी संघ निवड करण्यासाठी बैठक होणार होती. मात्र, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाशी वारंवार चर्चा करीत आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉन संसर्गाच्या परिस्थितीचाही आढावा घेत आहे. हे चित्र पूर्ण स्पष्ट झाल्यानंतरच निवड समितीची बैठक घेतली जाणार आहे. महत्वाचं म्हणजे, दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव आणखी वाढल्यास भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केला जाऊ शकतो.
या दौऱ्यावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार टी-20 सामन्यांची मालिका खेळणार होता. भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. भारतानं नुकताच इंग्लंडचा दौरा केलाय. त्यानंतर भारतीय कॅम्पमध्ये कोरोनाचे प्रकरण समोर आल्यानंतर मँचेस्टरमधील पाचवा कसोटी सामना पुढे ढकलावा लागला होता. हा कसोटी सामना 2022 मध्ये खेळला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- 'अॅशेस'पूर्वी इंग्लंडसाठी आनंदाची बातमी, धाकड ऑलराऊंडर टीममध्ये परत, ऑस्ट्रेलियाची खैर नाही
- Anil Kumble On KL Rahul: पंजाब किंग्जनं केएल राहुलला का वगळलं? प्रशिक्षक अनिल कुंबळेंनी उघडलं गुपित
- IPL 2022 Retention : मुंबईला हार्दिक, चेन्नईला रैना परवडणार का? रिटेंनशननंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक?