Team India : देसी बॉईज! न्यूझीलंडच्या समुद्रकिनारी टीम इंडियाच्या खेळाडूंचा डँशिंग लूक, पाहा Viral Video
Indian Cricketers Video : भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
India tour of New Zealand 2022 : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. टी-20 मालिकेसाठी जाहीर झालेल्या संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान मालिकेत आधी तीन टी20 आणि मग तीन एकदिवसीय सामने होणार असून या सामन्यांपूर्वी आता खेळाडू अगदी मस्तीच्या मूडमध्ये असून न्यूझीलंडमधील समुद्रकिनारी मजा-मस्ती करताना दिसत आहेत.
बऱ्याच काळानंतर भारतीय संघात पुनरागमन करणारा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचे काही खेळाडू समुद्रकिनाऱ्यावर मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये सर्व खेळाडू समुद्रातून बाहेर पडत असून कोणीही शर्ट घातलेला नसल्याने अगदी डॅशिंग लूकमध्ये प्लेयर्स दिसत आहेत. क्रिकेटर असल्याने सर्वांची फिट बॉडी असून व्हिडिओमध्ये सर्व खेळाडूंचे सिक्स पॅक अॅब्स दिसत दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये कर्णधार हार्दिक, श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंह, उम्रान मलिक हे सारे दिसत आहेत.
पाहा VIDEO :
View this post on Instagram
कसं आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड वेळापत्रक?
टी-20 मालिकेच वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 18 नोव्हेंबर | वेलिंग्टन |
दुसरा टी-20 सामना | 20 नोव्हेंबर | माउंट मॉन्गनुई |
तिसरा टी-20 सामना | 22 नोव्हेंबर | नॅपियर |
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 25 नोव्हेंबर | ऑकलँड |
दुसरा एकदिवसीय सामना | 27 नोव्हेंबर | हेमिल्टन |
तिसरा एकदिवसीय सामना | 30 नोव्हेंबर | क्राइस्टचर्च |
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
हे देखील वाचा-