भारत अन् दक्षिण अफ्रिका मॅच फिक्सिंग, 24 वर्षांनंतर प्रकरणाला नवे वळण, 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
India South Africa Match Fixing 2000: न्यायालयाने 14 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या पुराव्याच्या आधारे खटला पुढे चालवण्यास मान्यता दिली आहे.
India South Africa Match Fixing 2000: दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संघाने 2000 साली भारताचा (India) दौरा केला होता. दोन्ही देशांदरम्यान दोन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामने खेळले गेले, परंतु मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे हा दौरा आजपर्यंत चर्चेचा विषय राहिला आहे. आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे.
31 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने राजेश कालरा, संजीव चावला, कृष्ण कुमार आणि सुनील दारा यांच्यावर खटला चालवला आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी नेहा प्रिया यांनी या लोकांवर औपचारिकपणे आरोप निश्चित केले होते, परंतु त्यांनी आरोप नाकारले आणि खटला चालवण्याचा दावा केला. न्यायालयाने 14 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या पुराव्याच्या आधारे खटला पुढे चालवण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय काही साक्षीदारांना साक्ष देण्यासाठी समन्स पाठवण्यात आले होते. या प्रकरणात दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर हॅन्सी क्रॉन्झलाही आरोपी करण्यात आले होते, मात्र 2002 मध्ये त्याचा मृत्यू झाला होता. तर दुसरा आरोपी मनमोहन खट्टर हा फरार आहे. 11 जुलै रोजी न्यायालयाने बुकी संजीव चावला, टी सीरीजचे कृष्ण कुमार आणि अन्य दोन व्यक्तींसह चार जणांवर आरोप निश्चित केले होते. या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार संजीव चावला असल्याचेही सांगण्यात आले.
दक्षिण आफ्रिकेचा तत्कालीन कर्णधारावरही आरोप-
दक्षिण आफ्रिकेचा तत्कालीन कर्णधार हॅन्सी क्रोन्झवरही 2000 साली आरोप लावण्यात आले होते. मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यावरील खटला थांबवण्यात आला होता. 2000 मध्ये दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता, तर 2013 मध्ये 6 आरोपींविरुद्ध आरोपपत्र सादर केले होते. सर्व घटना, कॉल रेकॉर्ड, आचार आणि आजूबाजूची परिस्थिती ही संगनमत दर्शवते, असे न्यायालयाने म्हटले आहे. या सर्व घटना एकमेकांशी जोडल्या गेल्या आणि मॅच फिक्सिंगची घटना राजेश कालरा, कृष्ण कुमार, सुनील दारा आणि संजीव चावला यांनी संयुक्तपणे घडवून आणल्याचा आरोप लावण्यात आला. संजीव चावलाला फसवणुकीचा मास्टरमाईंड असल्याचं म्हटलं आहे.
संबंधित बातमी:
IPL Kavya Maran: आयपीएलच्या बैठकीत वाद, संघ मालकांमध्ये पडले दोन गट; काव्या मारन कोणाच्या बाजूने?